Jal Jeevan Mission Scheme : जलजीवन मिशन खर्चात नाशिक जिल्हा अव्वल

Jal Jeevan Mission
Jal Jeevan Missionesakal
Updated on

Nashik News : जलजीवन मिशन अंतर्गत कामांबाबत जिल्ह्यात ओरड सुरू असली तरी, या योजनेच्या खर्चात नाशिक जिल्हा राज्यात अव्वल ठरला आहे. या योजनेतंर्गत नाशिक जिल्ह्याचा सर्वाधिक ९३ कोटी रुपये खर्च झाला असून त्यापाठोपाठ पुणे जिल्ह्याचा (७८ कोटी खर्च) नंबर लागतो.

याशिवाय त्रयस्थ यंत्रणा पाहणी अहवाल प्राप्त करत, कामे सुरू करण्यातही नाशिक जिल्ह्याने आघाडी घेतली आहे. जलजीवन मिशन योजनेच्या राज्याच्या आढावा बैठकीतील आकडेवारीतून ही बाब समोर आली आहे.(Jal Jeevan Mission Scheme update expense of Jal Jeevan Mission Nashik District Top district is leading in state in starting works Nashik News)

हर घर नल से जल हे घोषवाक्य घेऊन जलजीवन मिशन योजनेची केंद्र सरकारने घोषणा केली. या योजनेतंर्गत नाशिक जिल्ह्यात १२२२ कामे मंजूर झाली असून त्यासाठी १४१० कोटींचा निधी मंजूर झाला आहे. १२२२ कामांपैकी १६१ कामे पूर्ण झाली आहे. ३० योजना विविध कारणांनी अद्याप सुरू होऊ शकलेल्या नाहीत.

तर, १०३० योजना प्रगतीत आहे. सदर योजना सन २०२४ अखेर पूर्ण करायची असल्याने दर आठवड्याला या योजनेचा राज्याच्या ग्रामीण पाणी पुरवठा विभागाकडून आढावा घेतला जातो. मंगळवारी (ता.२७) झालेल्या आढावा बैठकीत राज्यातील सर्व जिल्ह्यांचा आढावा झाला. यात नाशिक जिल्ह्यात जलजीवन मिशन योजनेतंर्गत सर्वाधिक ९७५ कामांचे त्रयस्थ यंत्रणेकडून पाहणी झालेली आहे. यातील ५७३ अहवाल प्राप्त देखील झाले आहेत.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Jal Jeevan Mission
Nashik News: बेशिस्त चालकांना लगाम घालणार कोण? 2 मुलांचा बळी; वाहतूक पोलिसांचा ‘वसुली’वर डोळा

त्यामुळे या कामात नाशिक जिल्हा राज्यात आघाडीवर आहे. यानंतर पुणे जिल्ह्याचा नंबर लागतो. पुणे जिल्हयात १२२४ कामांपैकी ५७४ कामांचे त्रयस्थ यंत्रणेकडून पाहणी झाली असून २४४ योजनेचे अहवाल प्राप्त झालेले आहे. पाहणी अहवाल प्राप्त करण्यापाठोपाठ, खर्चात देखील जिल्ह्याने अव्वल स्थान पटकविले आहे. कामांस प्रारंभ झाल्यानंतर ३० टक्के काम पूर्ण झाल्यानंतर पहिले बिल काढले जाते.

नाशिक जिल्ह्यात आतापर्यंत ९३ कोटींची बिले काढण्यात आली आहे. पुणे जिल्ह्यात ७८ कोटी खर्च झाला असून सातारा ३८ कोटी तर, नागपूर जिल्ह्यात २७ कोटींचा खर्च झाला आहे. नाशिक जिल्ह्यात केवळ ३० कामे सुरू न झाल्याचे जिल्हा परिषदेच्या मुख्यकार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांनी सांगितले.

गुणात्मक व दर्जात्मक कामे व्हावी, यासाठी कामांची पाहणी करण्यासाठी समिती नियुक्त केली आहे. या समितीकडून तक्रारी असलेल्या गावात जाऊन योजनेची पाहणी केली जात आहे. चांदवड व देवळा तालुक्यातील योजनांची पाहणी झाली आहे. यात एका ठिकाणी काम सुरू झालेले नसल्याचे दिसून आले. त्या ठेकेदारावर कारवाई केली जाणार असल्याचे श्रीमती मित्तल यांनी सांगितले.

Jal Jeevan Mission
Nashik News: प्रकल्पग्रस्तांचा पायी मोर्चा मुंबईकडे रवाना; मुख्यमंत्र्यांना देणार निवेदन

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()