Nashik District Collector : जिल्हाधिकारी गंगाथरन डी. यांची बदली; 'हे' आहेत नाशिकचे नवे जिल्हाधिकारी

Jalaj Sharma is  new district Collector of nashik news
Jalaj Sharma is new district Collector of nashik newsesakal
Updated on

Nashik News : तीन महिन्यांपासून बदलीसाठी प्रयत्नशील असलेले जिल्हाधिकारी गंगाथरन डी. यांची मुंबई महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्तपदी बदली झाली; तर धुळ्याचे जिल्हाधिकारी जलज शर्मा यांची नाशिकला बदली झाली आहे. (Jalaj Sharma is new district Collector of nashik news)

गंगाथरन डी. कौटुंबिक अडचणीमुळे जवळपास तीन महिन्यांपासून बदलीसाठी प्रयत्नशील होते. मात्र, रखडलेली बदली आज झाली. त्यांची बदली मुंबईत झाल्याने दोन वर्षांपूर्वी नाशिक महापालिका आयुक्तपदासाठी ते इच्छुक असल्याची चर्चा होती. मात्र, आयुक्तपदाऐवजी जिल्हाधिकारी म्हणून बदली झाली होती.

बदलीनंतर ‘सकाळ’शी बोलताना ते म्हणाले, की नाशिक हा छानच जिल्हा आहे. एक अधिकारी म्हणून काम करण्यासाठी नवीन शिकण्यासाठी नाशिकचा अनुभव खूपच उपयुक्त असतो. एकाच वेळी उद्योग, कृषी, आदिवासी, दुष्काळ, अतिवृष्टी अशा व्यापक भागांत काम करावे लागते.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Jalaj Sharma is  new district Collector of nashik news
Nashik News: NMCत कामांची माहिती गोळा करण्याची जुळवाजुळव सुरू; कामकाजाचा लेखाजोखा घेणार खुद्द पालकमंत्री!

भूसंपादन, नवे प्रकल्प, सिंचन यासह अनेक अर्थांनी अनुभव कामी येतो. इथले नागरिक, लोकप्रतिनिधीचे सहकार्य असते. त्यामुळे नाशिकला काम करायला आवडतेच. पण, माझी कौटुंबिक अडचण असल्याने मला नाशिक सोडावे लागले. पण, नाशिक कायम स्मरणात राहील.

जलज शर्मा नवे जिल्हाधिकारी

जलज शर्मा हे चंडीगड येथील असून, त्यांनी संगणक अभियांत्रिकीचे शिक्षण घेतले आहे. भारतीय प्रशासकीय सेवेच्या २०१४ च्या तुकडीचे ते अधिकारी आहेत. त्यांनी यापूर्वी जळगावला उपविभागीय अधिकारी, यवतमाळ जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि नागपूर महापालिका अतिरिक्त आयुक्तपदांवर काम केले. सध्या ते धुळे येथे जिल्हाधिकारी म्हणून कार्यरत होते.

Jalaj Sharma is  new district Collector of nashik news
Nashik Rain Alert : जिल्ह्याच्या घाटमाथा भागात आज जोरदार पावसाचा अंदाज

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.