NEET-UG 2024 Exam Result : ‘यूजी-नीट’मधील घोळाविरोधात विद्यार्थी-पालक आक्रमक; विद्यार्थ्यांना ‘ग्रेस’ गुणांची खैरात

Exam Result : धुळे आयएमएपाठोपाठ जळगाव आयएमएनेही त्याविरोधात केंद्र सरकारकडे तक्रार केली असून, त्यासंबंधी निर्णय होत नाही तोपर्यंत प्रवेशप्रक्रिया सुरू करू नये, अशी मागणी केली आहे.
NEET Exam
NEET ExamSakal
Updated on

NEET-UG 2024 Exam Result : वैद्यकीय अभ्यासक्रमासाठी प्रवेशपूर्व परीक्षा घेणाऱ्या National Testing Agency (NTA) ने नुकताच ‘यूजी-नीट’ परीक्षेचा निकाल जाहीर केला असून, त्यात मोठ्या प्रमाणावर उघड झालेल्या घोळाच्या विरोधात आता वैद्यकीय क्षेत्रातील संघटना आक्रमक पवित्र्यात आहे. धुळे आयएमएपाठोपाठ जळगाव आयएमएनेही त्याविरोधात केंद्र सरकारकडे तक्रार केली असून, त्यासंबंधी निर्णय होत नाही तोपर्यंत प्रवेशप्रक्रिया सुरू करू नये, अशी मागणी केली आहे. (Students Parents Aggressive Against UG NEET result Confusion)

वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी National Testing Agency (NTA)तर्फे दर वर्षी परीक्षा घेतली जाते. या वर्षी ही परीक्षा ५ मेस झाली होती. देशभरातील हजारो केंद्रांवर जवळपास २५ लाखांहून अधिक विद्यार्थी प्रविष्ट झाले. त्यापैकी १३ लाखांवर विद्यार्थी वैद्यकीय अभ्यासक्रमातील विविध शाखांच्या प्रवेशासाठी पात्र ठरलेत.

परंतु, ‘एनटीए’ने जाहीर केलेल्या निकालात हजारो विद्यार्थ्यांना त्यांच्या केंद्रावर प्रश्‍नपत्रिका उशिरा मिळाल्याचे कारण सांगत अतिरिक्त गुण खैरातीसारखे देण्यात आले आहेत. विशिष्ट परीक्षा केंद्रांवरील विद्यार्थ्यांनाच ७२० पैकी ७२० गुण मिळाले आहेत. त्यामुळे प्रामाणिक व गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांवर अन्याय होणार आहे.

त्यांची पुनर्परीक्षा घ्यावी

या घोळामुळे यूजी-नीट परीक्षाच रद्द करून पुन्हा घ्यावी, अशी मागणी होत आहे. मात्र त्यामुळे सर्वच लाखो विद्यार्थ्यांचे नुकसान होऊन यंत्रणाही वेठीस धरली जाई. त्यापेक्षा ज्या केंद्रांवर उशिरा पेपर मिळाले त्यांना अतिरिक्त गुण न देता अशाच विद्यार्थ्यांची पुन्हा परीक्षा घ्यावी, अशी मागणी आयएमए, तसेच विविध पालक संघटनांकडून होत आहे. (latest marathi news)

NEET Exam
NEET-UG 2022 : परीक्षा पुढे ढकलण्यासाठी दिल्ली हाय कोर्टात याचिका

काय आहे घोळ?

‘नीट’ परीक्षेचा पेपर लीक झाल्याबद्दल गदारोळ उडालेला असतानाच हा घोळ समोर आला आहे. पहिल्या शंभर जणांची यादी NTA त्यांच्या वेबसाइटवर जाहीर करते. त्यात सुमारे ६०पेक्षा अधिक मुले विशिष्ट परीक्षा केंद्रातील आहेत. या विद्यार्थ्यांनी पूर्ण ओळख समोर येऊन नये म्हणून अर्ज भरतानाच त्यांची आडनावे लावली नाहीत. तमिळनाडूमधल्या चार, बिहारमधल्या दोन-तीन केंद्रांतील मुलांनाही पूर्ण ७२० गुण मिळाले आहेत. दर वर्षी बोटावर मोजण्याइतक्या मुलांना ७२० गुण मिळतात, तर यंदा पूर्ण गुण मिळविणाऱ्यांची संख्या ६०हून अधिक कशी गेली? हा प्रश्‍न आहे.

अतिरिक्त गुणांची खैरात

काही विशिष्ट परीक्षा केंद्रांवर विद्यार्थ्यांना प्रश्नपत्रिका उशिरा दिल्या गेल्याचे कारण पुढे करत अशा केंद्रांवरील विद्यार्थ्यांना अतिरिक्त गुण (ग्रेस मार्क्स) देण्यात आले. अशा विद्यार्थ्यांची संख्याही २० हजारांपेक्षा अधिक आहे. त्यामुळे या सर्व विद्यार्थ्यांना भरघोस गुण मिळाले असून, असे होणे शक्य नाही.

‘नीट’ची परीक्षा निगेटिव्ह मार्किंगद्वारे होत असते. प्रत्येक प्रश्‍नाला ४ गुण असतात. त्यामुळे गुण मिळण्याचे स्वरूप ४ किंवा निगेटिव्ह मार्किंगने कमी होणारा १ गुण अशा पाचच्या पटीत कमी-अधिक होऊ शकतात. असे असताना काही विद्यार्थ्यांना ७१८, ७१९ असे गुण आहेत. असे गुण मिळणे यात शक्यच नाही.

NEET Exam
NEET Exam Result : नीट परीक्षेत ग्रामीण विद्यार्थ्यांची यशस्वी भरारी

मेरिट खूपच वाढेल

पेपर लीक झाल्यामुळे आधीच सावळा गोंधळ होता. त्यात ग्रेस मार्क्स व अशा घोळामुळे यंदा मेडिकलचे मेरिट खूप वाढणार आहे. सहाशेवर गुण असलेल्या विद्यार्थ्यांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश मिळायचा; आता ६५० पेक्षा अधिक गुण असलेल्या विद्यार्थ्यांनाही प्रवेशासाठी संघर्ष करावा लागणार असल्याने त्यांचे पालक चिंतेत आहेत.

यूजी-नीट परीक्षेविषयी संशय का ?

- ६७ परीक्षार्थीना इंडिया रॅक (एआयआर) १

- परीक्षार्थीना ७२० पैकी ७१८ आणि ७१९ गुण

- टॉपर परीक्षार्थीपैकी ८ जण एकाच केंद्रातील

- १४ जूनला निकाल असताना ४ जूनला जाहीर

- लोकसभेच्या निकालाच्या दिवशीच हा निकाल

NEET Exam
NEET UG Result 2023 Topper : प्रबंजन आणि वरुण NEET UG मध्ये अव्वल, येथे पहा संपूर्ण टॉपर्सची यादी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com