Jalna Lathi Charge: मराठा आंदोलकांवर लाठीचार्जच्या निषेधार्थ वणीत रस्ता रोको

Jalna Lathi Charge protest
Jalna Lathi Charge protestesakal
Updated on

Jalna Lathi Charge : जालना जिल्ह्यातील सराटी अंतरवाली येथे मराठा आरक्षणासाठी उपोषण करणाऱ्या आंदोलकांवर अमानुषपणे लाठीचार्ज करण्याच्या घटनेच्या निषेधार्थ वणी येथील सुरत- शिर्डी- नाशिक महामार्गावर मराठा समाजातर्फे रस्ता रोको आंदोलन करण्यात आले. (Jalna Lathi Charge road Block in Wani to protest lathi charge on Maratha protesters Nashik)

सकल मराठा समाजाच्यावतीने रविवारी सकाळी अकरा वाजता वणीतील सुरत - शिर्डी - नाशिक रस्त्यावरील छत्रपती संभाजी महाराज चौकात कार्यकर्ते एकवटून रस्ता रोकाे आंदोलनास सुरुवात झाली.

राज्य सरकार व प्रशासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करीतन कार्यकर्ते रस्त्यात ठाण मांडून बसले होते.

यावेळी आंदोलकांवर लाठीचाराचे आदेश देणारा पोलिस अधिकारी व राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तत्काळ राजीनामा दिला पाहिजे, मराठा आरक्षण मिळालेच पाहिजे, लाठीचार्ज करणाऱ्या प्रशासन व राज्य सरकारचा धिक्कार असो अशा घोषणांनी परीसर दणाणून गेला होता.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Jalna Lathi Charge protest
Jalna Lathi Charge: पोलिस ‘अलर्ट मोड’वर! शहर-जिल्ह्यात कडेकोट बंदोबस्त; सायबल सेलकडून ‘वॉच’

रस्ता रोको दरम्यान मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष चंद्रकांत बनकर, उपसरपंच विलास कड, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेक्षाध्यक्ष संदीप जगताप, वमकोचे अध्यक्ष महेंद्र बोरा, बाजार समितीचे सभापती प्रशांत कड, बाळासाहेब घडवजे, गंगाधर निखाडे, अॅड. विलास निरघुडे, बर्डे, नितीन शेळके, जमिर शेख, संतोष रेहरे,

जितेंद्र शिरसाठ, सुधाकर घडवजे, नामदेव घडवजे, राजेंद्र थोरात, चिंधु पाटील आदींसह विविध संस्था, ग्रामपंचायत पदाधिकारी, सकल मराठा महासंघाचे पदाधिकारी यांच्यासह सर्वपक्षीय व सर्वसमाजातील कार्यकर्ते सहभागी होवून आंदोलनास पाठींबा दिला.

वणीचे सहाय्यक पोलिस निलेश बोडखे यांना आंदोलन कर्त्यांनी निवेदन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. आंदोलना दरम्यान जवळपास एक तास सुरु असलेल्या या रस्ता रोकोमूळे सापूतारा, पिपंळगाव, नाशिक रस्त्यावर वाहानांच्या सुमारे एक किलो मिटर अंतरापर्यंत रांगा लागल्या होत्या त्यामूळे गडावर, सापूतारा येथो जाणाऱ्या येणाऱ्या भाविक पर्यटकांसह प्रवाशांना सुमारे तास खोळंबून राहावे लागले.

Jalna Lathi Charge protest
Jalna Maratha Protest Violence: नामपूरला राज्य सरकारच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.