Jalna Maratha Protest Violence: नामपूरला राज्य सरकारच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन

Jalna Maratha Protest Violence
Jalna Maratha Protest Violenceesakal
Updated on

Jalna Maratha Protest : जालना जिल्ह्यातील अंतरवली सराटी गावात मराठा आरक्षणासाठी उपोषण करणाऱ्या आंदोलकांवर पोलिसांनी लाठीचार्ज केल्याच्या घटनेच्या निषेधार्थ उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना, सकल मराठा समाज बांधवांच्या वतीने येथील मध्यवर्ती बसस्थाकासमोर रास्तारोको आंदोलन करण्यात आले.

आंदोलकांच्या वतीने राज्य सरकारच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे यावेळी दहन करण्यात आले. जायखेडा पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने आंदोलनकाळात कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. (Jalna Maratha Protest Violence Burning of State Govt symbolic effigy in Nampur nashik)

समाजमाध्यमात जालना लाठीचार्ज घटनेचा विविध सामाजिक राजकीय संघटनांतर्फे जाहीर निषेध व्यक्त करण्यात आला. सोशल मीडियावर नामपूर बंदचे आवाहन करण्यात आले होते. त्यामुळे सर्व व्यापाऱ्यांनी कडकडीत बंद पाळून आंदोलनास पाठिंबा दिला.

सकाळी नऊ वाजेपासून आंदोलनस्थळी पदाधिकारी, कार्यकर्ते, पोलीस प्रशासन जमायला सुरुवात झाली. सकाळी दहा वाजता रास्तारोको आंदोलनास सुरवात झाली.

यावेळी शिवसेनेचे तालुका उपाध्यक्ष जितेंद्र सूर्यवंशी म्हणाले की, राज्य शासनाने आर्थिक निकषांवर मराठा समाजाला तातडीने आरक्षण लागू करणे गरजेचे आहे.

राज्यभरात मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी शांततेच्या मार्गाने लाखोंच्या संख्येचे ५३ मोर्चे काढण्यात आले होते. सदर मोर्चांची दखल जगाने घेतली. यावेळी तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष विनोद सावंत, टेंभे येथील ग्रामपंचायत सदस्य पंडित ठोके-पाटील, निवृत्त मुख्याध्यापक ए.डी.पगार, समाधान देवरे, चारू खैरनार आदींनी यावेळी मनोगत व्यक्त केले.

यावेळी शिवसेनेचे पदाधिकारी, मराठा समाज बांधव, सर्वपक्षीय पदाधिकारी आदी शेकडो नागरिक उपस्थित होते.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Jalna Maratha Protest Violence
Jalna Violence : पोलिसांनी लाठीमार केल्याच्या निषेधार्थ; फुलंब्री तालुक्यातील सरपंचाने जाळली स्वतःची नवी मोटार

मराठा आरक्षणासाठी उपोषण करणाऱ्या आंदोलकांवर पोलिसांनी अमानुषपणे लाठीचार्ज केल्याच्या घटनेचा यावेळी जाहीर निषेध व्यक्त करण्यात आला. सध्याच्या राज्य सरकार मधील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तमाम मराठा समाजाची माफी मागावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली.

आहे. आंदोलनानंतर व्यापाऱ्यांनी आपली दुकाने सुरू केल्याने बाजारपेठेतील व्यवहार सुरळीत झाले.

Jalna Maratha Protest Violence
Jalna Lathi Charge : 'पोलीसांचा दोष नाही, सरकारच...'; जालन्यातील लाठीमार प्रकरणी नाना पटोलेंचं मोठं वक्तव्य

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.