भारती पवार म्हणाल्या, 'नाशिक जिल्ह्याच्या विकासासाठी प्रयत्नशील राहणार'

Bharati Pawar
Bharati PawarSakal
Updated on

चांदवड (जि. नाशिक) : कांदा आणि द्राक्षाचा प्रश्र्न मी समर्थपणे पेलेल तसेच केंद्रात काम करत असताना मी नाशिक जिल्ह्याच्या विकासासाठी प्रयत्नशील राहील असे प्रतिपादन जन आशीर्वाद यात्रेच्या (Jan Aashirwd Yatra) निमित्ताने केंद्रीय राज्यमंत्री भारती पवार (Dr Bharati Pawar) यांनी चांदवड येथे केले. यावेळी त्यांनी केंद्राच्या योजनांची अंमलबजावणी व नागरिकांच्या समस्या जाणून घेण्यावर या दौऱ्यात भर दिला.

राज्याच्या विकासासाठी व देशाच्या विकासासाठी तुमची मुलगी म्हणून मी नक्कीच काम करेन, हे काम करतांना नाशिक जिल्ह्यावर माझे विशेष लक्ष राहणार असे प्रतिपादन केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री डॉ. भारती पवार यांनी चांदवड येथील जन आशीर्वाद यात्रेप्रसंगी केले. मंत्रिपदाची शपथ घेतांना सर्व नाशिक जिल्ह्याची जनता माझ्या डोळ्यासमोर होती असे भावनिक उद्गार देखील त्यांनी यावेळी काढले.

मोदींचे सर्व राज्यांवर लक्ष

राज्याच्या आरोग्यासाठी पंतप्रधान मोदी यांचे सर्वच राज्यांवर काटेकोरपणे लक्ष असून महाराष्ट्रावर देखील आरोग्याच्या बाबतीत ते विशेष काळजी घेत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील जनतेला दिलेल्या केंद्रातील विकासाच्या योजना पोहोचविण्यासाठी व नागरिकांच्या समस्या जाणून घेत त्या सोडविण्यावर भर देण्यासाठी हा जन आशीर्वाद दौरा असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. यावेळी झालेल्या जाहीर सभेत भाजपचे जिल्हा अध्यक्ष केदा आहेर यांनी प्रास्ताविक केले. चांदवड देवळा मतदार संघाचे आमदार डॉ राहुल आहेर यांनी मतदार संघाचे प्रश्र्न मांडताना केंद्राचा जास्तीत जास्त निधी उपलब्ध करून देण्यात यावा अशी मागणी केली. यावेळी चांदवड तालुक्यातील जनतेच्या वतीने केंद्रीय राज्यमंत्री डॉ भारती पवार यांचा नागरी सत्कार करण्यात आला.

Bharati Pawar
नाशिक : टोलनाक्यावर तृतीयपंथी- वाहन चालकांमध्ये फ्री स्टाईल हाणामारी

यावेळी अनु जमाती मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष व जन आशिर्वाद यात्रेचे समन्वयक आमदार प्रा अशोक उइके, आमदार डॉ राहुल आहेर, किशोर काळकर, प्रकाव गेडाम, जिल्हा अध्यक्ष केदा आहेर, चांदवड कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती डॉ आत्माराम कुंभार्डे, माजी नगराध्यक्ष भूषण कासलीवाल, सुनील बच्छाव, नंदकुमार खैरनार,युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष सचिन दराडे, भाजपाचे तालुकाध्यक्ष मनोज शिंदे, बाजार समितीचे संचालक विक्रम मार्कंड, पंढरीनाथ खताळ, विलास ढोमसे, फौजी नाना घुले, युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष अॅड शांताराम भवर, डॉ. नितीन गांगुर्डे, महिला आघाडीच्या तालुका अध्यक्ष गिता झाल्टे, विकास भुजाडे, डॉ. भाऊराव देवरे, अंकुर कासलीवाल, वाल्मिक वानखेडे, दयानंद अहिरे आदी उपस्थित होते.

Bharati Pawar
नाशिक जिल्ह्यात एक हजार ६८ कोरोना बाधितांवर उपचार सुरु

पत्रकार परिषदेतील मुद्दे…

- देशातील नागरिकांच्या आरोग्याच्या समस्या जाणून घेत समस्या सोडविण्यासाठी भर देण्यात येणार आहे..

- देशात ५५ कोटी तर राज्यात ५ कोटी जनतेचे लसीकरण झाले आहे..

- इतर देशांच्या तुलनेत देशात मोठ्या प्रमाणावर लसीकरण सुरू…

- पंतप्रधान मोदी यांचे देशातील सर्व राज्यांवर आरोग्याच्या दृष्टीने काटेकोरपणे लक्ष..

- शिवसेनेचे टॅग लाईन चोरन्याच्या आरोप असल्याच्या मुद्द्यावर त्यांनी भाष्य करतांना सांगितले की, देशात आदिवासी, ओबीसी महिला मंत्री झाल्याचे दुःख शिवसेनेला व विरोधी पक्षाच्या नेत्यांना असल्यानेच ते असे म्हणत आहेत.

- पंतप्रधान मोदी यांनी आमची माहिती द्यावी हा आमच्यासाठी मोठा अभिमान आहे..

- जनतेने निवडून देत खासदार केलं आणि आज मंत्रिपदाची माळ गळ्यात पडली यामुळे जनतेचे आशीर्वाद घेण्यासाठी मी आले आहे..

Bharati Pawar
केंद्रीय विद्यापीठांमध्ये प्रवेशाच्‍या सीयू-सीईटीसाठी १ सप्‍टेंबरपर्यंत मुदत

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.