नाशिक : महापालिकेचे पुढील वर्षाचे नवीन वर्षाचे अंदाजपत्रक तसेच चालू वर्षाचे सुधारित अंदाजपत्रक सादर करण्यासाठी खाते प्रमुखांना मुदत दिली असतानादेखील माहिती सादर न केल्याने या विभागांना आता २ जानेवारीचा अंतिम अल्टिमेटम देण्यात आला आहे.
या दिवसात ताळेबंद सादर केला नाही, तर कारवाईला सामोरे जावे लागणार आहे. (January 2 ultimatum to account heads Nashik NMC News)
२०२४ मध्ये लोकसभेच्या निवडणुका आहे. साधारण एप्रिल, मे या कालावधीमध्ये निवडणुका होतील. त्याअनुषंगाने २५ दिवस अगोदरच म्हणजे मार्च महिन्याच्या मध्यावर आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे.
त्यामुळे महापालिका प्रशासनाकडून सुधारित व नवीन वर्षाचे अंदाजपत्रक तयार करण्याची घाई सुरू आहे. २८ फेब्रुवारीअखेर अंदाजपत्रक मंजुरी करण्याचे प्रयत्न आहे, मात्र विभागप्रमुखांकडून अंदाजपत्रक तयार करण्यासाठी जमा व खर्चाची तसेच नवीन योजनांची माहिती मिळत नाही.
महापालिकेचे एकूण ४३ विभागापासून त्यातील ३६ विभागांना माहिती सादर करण्यासाठी १५ डिसेंबरची मुदत देण्यात आली होती. मात्र फक्त २४ विभागांनी जमाखर्चाचा ताळेबंद सादर केला.
बारा विभागांनी माहिती सादर केली नाही. त्यामुळे या विभागांना २२ डिसेंबरचा अल्टिमेटम देण्यात आला होता. नगर नियोजन, उद्यान, बांधकाम, सार्वजनिक आरोग्य, पाणीपुरवठा या महत्त्वाच्या विभागांसह सिडको, पश्चिम या दोन प्रमुख विभागाकडून अपेक्षित माहिती आली नाही.
त्यामुळे बुधवारी (ता. २७) विभाग प्रमुखांची बैठक झाली. या बैठकीतही ताळेबंद सादर केला नाही. त्यामुळे आता २ जानेवारीचा अल्टिमेटम देण्यात आला असून, या कालावधीत जर जमाखर्चाचा ताळेबंद सादर केला नाही तर खाते प्रमुखांवर कारवाई केली जाणार आहे
अडीच हजार कोटींपर्यंत अंदाजपत्रक
२०२३ व २४ या आर्थिक वर्षासाठी २४७७ कोटी रुपयांचे अंदाजपत्रक तयार करण्यात आले होते. यामध्ये भांडवली खर्चासाठी ७०१ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली होती.
२०२४ व २५ या आर्थिक वर्षासाठीदेखील जवळपास तेवढेच खर्चाचे अंदाजपत्रक सादर केले जाणार आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.
सुधारित अंदाजपत्रक तयार करण्यासाठी खाते प्रमुखांकडून जमाखर्चाचा हिशोब, पुढील वर्षासाठी लागणारा निधी यासंदर्भात माहिती मागविली जात आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.