Nashik News : जातपंचायत पिडीतांच्या व्यथा आता संयुक्त राष्ट्रसंघात!

United Nations
United Nations esakal
Updated on

नाशिक : जातपंचायतीच्या सर्वच घटनांत महिलांवर अन्याय, अत्याचार झाल्याने महिलांच्या इतर प्रश्नांसोबतच जातपंचायतीच्या पिडीतांच्या व्यथा आता संयुक्त राष्ट्रसंघ पुरस्कृत आंतरराष्ट्रीय महिला आयोगात मांडले जाणार असून त्यासाठी विधान परिषदेच्या उपसभापती व स्त्री आधार केंद्राच्या अध्यक्षा नीलम गोऱ्हे विशेष प्रयत्न करत असल्याची माहिती जातपंचायत मूठमाती अभियानाचे कार्यवाह कृष्णा चांदगुडे यांनी दिली. (Jat panchayat victims problems now in United Nations Nashik News)

हेही वाचा : ..ही काळजी घ्या नाहीतर खिसा होईल साफ!

United Nations
Dhule News : जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचा पुढाकार; पूरस्थितीत शोध बचावाचे प्रशिक्षण

आंतरराष्ट्रीय महिला आयोगाने ६ ते १७ मार्चला न्यूयॉर्क येथील त्यांच्या कार्यालयात ६७ वे सत्र आयोजित केले आहे. नीलमताई अध्यक्षा असलेल्या स्त्री आधार केंद्राने इतर अनेक संस्थांप्रमाणेच संयुक्त राष्ट्रसंघाच्या आर्थिक व सामाजिक परिषदेचे सदस्यत्व घेतले आहे.

या अंतर्गत ११ मार्च रोजी एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. ‘ग्रामीण भागात महिलांनी सार्वजनिक ठिकाणचे अत्याचार रोखण्याच्या कामात मिळविलेले यश’ या विषयावर परिसंवाद आयोजित करण्यात आला आहे.

गेल्या दहा वर्षांत ग्रामीण भागात महिला अत्याचार रोखण्यासंदर्भात आलेल्या अडचणीवर कशी मात केली, त्यातून बाहेर निघण्यासाठी काय प्रयत्न झाले. या बरोबरच शासन स्तरावरून याबाबत मार्ग काढण्यासाठी कोणत्या प्रकारच्या विकास योजना तयार करता येईल, याचा ऊहापोह त्यात होईल. या मध्ये नाशिक येथील जातपंचायत मूठमाती अभियानाचे राज्य कार्यवाह कृष्णा चांदगुडे सहभागी होणार आहेत.

United Nations
Onion Agitation : लासलगावच्या आंदोलनाची अखेर दखल; पालकमंत्री दाखल, कांदाप्रश्‍नी मुख्यमंत्र्यांसोबत बैठक घेणार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.