Jayant Patil News : कधी नव्हे ते इतके मोठे दुष्काळाचे संकट शेतकऱ्यांवर आले आहे. आठ महिने दुष्काळाला तोंड देत होतो, आता अवकाळी पावसाने सगळे नष्ट केले आहे. शेतकरी दारात आल्याशिवाय त्याला काहीच द्यायचे नाही, हे सरकारचे धोरण आहे.
म्हणून गेल्या अनेक महिन्यांपासून सतत मागणी केल्यानंतर फक्त राज्यातील काही भागात या सरकारने दुष्काळ जाहीर केला आहे. आता अवकाळी पावसाने शेतकरी पूर्ण उद्ध्वस्त झाला आहे.
शेतीचे दुप्पट उत्पन्न देण्याचे आश्वासन या सरकारने दिले; मात्र आज आहे त्या परिस्थितीत जगण्यासाठी संपूर्ण कर्जमाफी करावी, असे सांगत शेतकऱ्यांच्या प्रश्नावर या अधिवेशनात सरकारवर दबाव आणू, असे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी शुक्रवारी (ता. १) येथे सांगितले. (jayant patil statement Give complete loan waiver to farmers nashik news)
शेतकऱ्यांच्या प्रश्नावर केंद्र व राज्य शासनाच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसने दिंडोरीत रणशिंग फुंकले. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या नेतृत्वात शुक्रवारी भव्य ट्रॅक्टर रॅली काढत शेतकरी आक्रोश मोर्चा काढला. दिंडोरी येथील कादवा पेट्रोलपंप येथून राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यासह आमदार सुनील भुसारा, दिंडोरी लोकसभा कार्याध्यक्ष दत्तात्रेय पाटील, जिल्हाध्यक्ष कोंडाजीमामा आव्हाड, गोकुळ पिंगळे, गजानन शेलार आदी सर्व नेते ट्रॅक्टरवर स्वार होत भव्य मोर्चा काढण्यात आला. जयंत पाटील हे स्वतः ट्रॅक्टर चालवत अग्रभागी होते. ‘कर्जमाफी झालीच पाहिजे’, ‘नुकसानभरपाई द्या’, ‘भाजप सरकारचा धिक्कार असो’,
‘शरद पवारांचा बालेकिल्ला, नाशिक जिल्हा नाशिक जिल्हा’, अशा घोषणा देत मोर्चा तहसील कार्यालयावर मोर्चा धडकला. तहसीलदार पंकज पवार यांना निवेदन देण्यात आले. त्यानंतर संस्कृती लॉन्स येथे मोर्चाचे विसर्जन होत सभा झाली. सभेत जयंत पाटील म्हणाले, की आज नुकसानग्रस्त भागाचा दौरा करत होतो. त्या वेळी शेतकरी कुऱ्हाडीने द्राक्षाची झाडे तोडत होता. तीन- साडेतीन लाख खर्च करून जर एक रुपयाही मिळणार नसेल तर ‘नको हे पीक’, अशी शेतकऱ्यांची मानसिकता झाली आहे. या परिस्थितीत सरकारने पुढाकार घेतला पाहिजे.
शेतकऱ्यांच्या कर्जाचे पुनर्गठन केले पाहिजे. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचे धोरण आखले पाहिजे.या सरकारने अर्धवट दुष्काळ जाहीर केला आहे. काही ठिकाणी दुष्काळसदृश परिस्थिती आहे, असे सरकार म्हणतेय. जिथे दुष्काळसदृश परिस्थिती आहे तिथे शेतकऱ्यांना वीजबिल माफ केले जाणार का, विद्यार्थ्यांना फी माफ केली जाणार का, सरकारने कोणत्याही नियम व अटी न ठेवता सरसकट दुष्काळ जाहीर करावा व सर्वांना सर्व सवलती द्याव्यात, ही आमची मागणी आहे. मोर्चा आणला; पण हा लढा इथेच थांबणार नाही. आम्ही सर्व सहकाऱ्यांच्या मदतीने येणाऱ्या हिवाळी अधिवेशनात सर्व प्रश्न लावून धरणार असल्याचे जयंत पाटील यांनी सांगितले.
या वेळी राष्ट्रवादी लोकसभा कार्याध्यक्ष दत्तात्रेय पाटील यांनी शेतकऱ्यांच्या व्यथा मांडल्या. जिल्हाध्यक्ष कोंडाजीमामा आव्हाड, आमदार सुनील भुसारा, माजी आमदार शिरीष कोतवाल, नितीन भोसले, साहेबराव पाटील, तालुकाध्यक्ष भास्कर भगरे, महिला आघाडी जिल्हाध्यक्ष संगीता पाटील यांची भाषणे झाली. प्रारंभी ‘कादवा’चे संचालक बाळासाहेब जाधव यांचे निवासस्थानी पाटील यांचे स्वागत करण्यात आले.
या वेळी माजी आमदार संजय चव्हाण, दीपिका चव्हाण, गोकुळ पिंगळे, तिलोत्तमा पाटील, मविप्र संचालक प्रवीण जाधव, राष्ट्रवादी युवक प्रदेश कार्याध्यक्ष पुरुषोत्तम कडलग, जिल्हाध्यक्ष श्याम हिरे, शिवसेना तालुकाप्रमुख पांडुरंग गणोरे, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रकाश पिंगळ, माकपचे इंद्रजित गावित, कादवाचे उपाध्यक्ष शिवाजी बस्ते, राष्ट्रवादी विधानसभा अध्यक्ष संगीता ढगे, तालुकाध्यक्ष शैला उफाडे व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कादवाचे संचालक बाळासाहेब जाधव यांनी जयंत पाटील यांचे स्वागत केले. दिंडोरी शहराध्यक्ष नरेश देशमुख यांनी आभार मानले. सभेनंतर जयंत पाटील यांनी शेतकऱ्यांसमवेत जेवणाचा आस्वाद घेतला.
अजित पवार गटावर नाव न घेता टीका
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आम्हाला अन्यायाविरुद्ध उभे राहा, ज्याच्यावर अन्याय झाला त्या मागे जा म्हणून शिकवण दिली आहे; पण काहीजण सत्तेत गेले अन् ते पंचतारांकित हॉटेलमध्ये बैठका घेत आहेत. आम्ही शेतकऱ्यांच्या वेदना त्यांना भेटून जाणून घेत आहोत.
आर्थिक तिजोरी तुमच्याकडे, कृषिमंत्रिपद तुमच्याकडे, मग का शेतकऱ्यांसाठी तिजोरी मोकळी करत नाही, असे अप्रत्यक्ष अजितदादांवर टीका करतानाच कुटुंबातील काही गोष्टी, चर्चा कुटुंबात ठेवायच्या असतात. त्या चर्चा बाहेर सांगायच्या नसतात. हे चांगल्या मुलाचे लक्षण नाही, असा टोला प्रदेशाध्यक्ष पाटील यांनी अजितदादा यांचे न घेता लगावला. या सरकारमध्ये एकवाक्यता नाही, असेही ते म्हणाले.
नरहरी झिरवाळ यांच्याबाबत चुप्पी
विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ हे अजितदादा पवार यांच्यासोबत गेले. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस दिंडोरीत काय रणनीती करणार, झिरवाळ यांच्याबाबत काय वक्तव्य करणार याची उत्कंठा होती. मात्र जयंत पाटील यांनी झिरवाळ यांच्याबाबत कोणतेही वक्तव्य न करता केवळ केंद्र व राज्य शासनाच्या कारभारावर टीका केली. कादवाचे संचालक बाळासाहेब जाधव यांनी जयंत पाटील यांचे स्वागत केले. दिंडोरी शहराध्यक्ष नरेश देशमुख यांनी आभार मानले. सभेनंतर जयंत पाटील यांनी शेतकऱ्यांसमवेत जेवणाचा आस्वाद घेतला.
अजित पवार गटावर नाव न घेता टीका
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आम्हाला अन्यायाविरुद्ध उभे राहा, ज्याच्यावर अन्याय झाला त्या मागे जा म्हणून शिकवण दिली आहे; पण काहीजण सत्तेत गेले अन् ते पंचतारांकित हॉटेलमध्ये बैठका घेत आहेत. आम्ही शेतकऱ्यांच्या वेदना त्यांना भेटून जाणून घेत आहोत. आर्थिक तिजोरी तुमच्याकडे, कृषिमंत्रिपद तुमच्याकडे, मग का शेतकऱ्यांसाठी तिजोरी मोकळी करत नाही, असे अप्रत्यक्ष अजितदादांवर टीका करतानाच कुटुंबातील काही गोष्टी, चर्चा कुटुंबात ठेवायच्या असतात. त्या चर्चा बाहेर सांगायच्या नसतात. हे चांगल्या मुलाचे लक्षण नाही, असा टोला प्रदेशाध्यक्ष पाटील यांनी अजितदादा यांचे न घेता लगावला. या सरकारमध्ये एकवाक्यता नाही, असेही ते म्हणाले.
नरहरी झिरवाळ यांच्याबाबत चुप्पी
विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ हे अजितदादा पवार यांच्यासोबत गेले. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस दिंडोरीत काय रणनीती करणार, झिरवाळ यांच्याबाबत काय वक्तव्य करणार याची उत्कंठा होती. मात्र जयंत पाटील यांनी झिरवाळ यांच्याबाबत कोणतेही वक्तव्य न करता केवळ केंद्र व राज्य शासनाच्या कारभारावर टीका केली.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.