इंधन दरवाढीने जेसीबी, पोकलेन, डंपरच्या भाडेदरांत वाढ

JCB Poklen dumper fare hike due to fuel price hike nashik News
JCB Poklen dumper fare hike due to fuel price hike nashik Newsesakal
Updated on

जुने नाशिक : वाढते इंधन दर आणि महागाईचा फटका अर्थमुव्हर्स व्यवसायासही बसला आहे. त्यामुळे अर्थमुव्हर्स कामासाठी लागणारे जेसीबी (JCB), ट्रॅक्टर, डंपर, पोकलेन यांसह विविध साहित्यांच्या भाडेदरात वाढ झाली आहे. शनिवार (ता. ९) पासून दरवाढ झाल्याची माहिती नाशिक अर्थमुव्हर्स असोसिएशनचे अध्यक्ष अब्बास मुजावर यांनी दिली.

देशात दिवसेंदिवस महागाईचा चांगलाच भडका उडत आहे. कधी नाही इतक्या मोठ्या प्रमाणात इंधनचे दर वाढले आहेत. जीवनावश्यक वस्तूंसह अन्य विविध गरजांवर महागाईचा परिणाम झाला आहे. त्यातून अर्थमुव्हर्स व्यवसाय अर्थात अधिकृत गौण खनिज उत्खनन (Minor mineral extraction) आणि वाहतूक व्यवसाय त्यातून सुटला नाही. इच्छा नसतानाही व्यावसायिकांना त्यांच्या व्यवसायात उपयुक्त असलेले यंत्र अर्थात जेसीबी, पोकलेन, डंपर, ट्रॅक्टर, हायवा, रोलर यांच्या भाडेदरात वाढ करावी लागली आहे.

JCB Poklen dumper fare hike due to fuel price hike nashik News
उतार वयात पती-पत्नीची जगण्यासाठी कसरत

दैनंदिन वाढते इंधन दरामुळे सध्या निर्माण झालेली परिस्थिती लक्षात घेता, सध्याचे दर व्यावसायिकांना न परवडणारे आहेत. त्यातून त्यांना आर्थिक नुकसान सहन करावे लागत आहे. यानिमित्त व्यावसायिकांनी दरवाढ करण्याची मागणी केली होती. त्यानुसार नाशिक अर्थमुव्हर्स असोसिएशन पदाधिकाऱ्यांची आणि व्यवसायिकांची बैठक झाली. बैठकीत दरवाढ करण्याचे निश्चित करण्यात आले. व्यवसायिकांना नुकसान नको आणि ग्राहकांवर अतिरिक्त आर्थिक भार नको, यासाठी बैठकीत विनिमय करून ठराविक दर निश्चित करण्यात आले आहेत. शनिवार (ता. ९)पासून वाढीव दराने ग्राहकांना साहित्य भाडेतत्त्वावर घेता येणार आहे, अशी माहिती असोसिएशनतर्फे देण्यात आली.

JCB Poklen dumper fare hike due to fuel price hike nashik News
डॉ. पवार यांचे यश; उत्तर महाराष्ट्रातील अशी पहिली शस्त्रक्रिया

असे असणार साहित्यांचे नवीन दर

साहित्य भाडेदर जेसीबी आणि पोकलेन (प्रतितासाचे दर)

प्रकार बकेट ब्रेकर

जेसीबी १ हजार १०० १ हजार ३००

पोकलेन E/७० १ हजार २०० १ हजार ४००

पोकलेन E/११० १ हजार ४०० १ हजार ८००

पोकलेन E/१२०, १३० १ हजार ७०० १ हजार ९००

पोकलेन E/२००, २१०, २२० २ हजार २०० २ हजार ४००

पोकलेन E/३८० ४ हजार ४ हजार ८००

डंपर ३ हजार ५०० -- प्रतिदिन

(चालक आणि इंधनाचा खर्च वेगळा)

हायवा ५ हजार ५०० --प्रतिदिन

(चालक आणि इंधनाचा खर्च वेगळा)

वायब्रेटर रोलर ६ हजार --प्रतिदिन

(चालक आणि इंधनाचा खर्च वेगळा)

ट्रॅक्टर २ हजार प्रतिदिन

"इच्छा नसताना केवळ इंधन दरवाढीमुळे अशाप्रकारची दरवाढ करण्यात आली आहे.'

-अब्बास मुजावर, अध्यक्ष, नाशिक अर्थमुव्हर्स असोसिएशन

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()