Nashik News: बोगस वनमजूर दाखवून जेसीबीने कामे; वन्य प्राण्यांच्या संरक्षणार्थ चौकीची मागणी

JCB works by showing bogus forest labor in Mamdapur forest area? Demand for inquiry, demand for post for protection of wild animals
JCB works by showing bogus forest labor in Mamdapur forest area? Demand for inquiry, demand for post for protection of wild animalsesakal
Updated on

Nashik News : शासनाकडून वनहद्द व वन्य प्राण्यांच्या विकासासाठी कोट्यवधी रुपयांचा निधी येत असताना ममदापूर-राजापूर वनहद्दीत मात्र याचा दुरुपयोग होत आहे. कागदावर बोगस वनमजूर दाखवून तसेच जेसीबीने कामे करून निधीची अफरातफर होत असल्याच्या तक्रारी होत आहे.

या सर्व प्रकाराची सखोलपणे चौकशी करावी तसेच या भागातील वन्यप्राण्यांच्या संरक्षणार्थ ममदापूर चौफुलीवर संरक्षक चौकी देण्यात यावी अशी मागणी छत्रपती फौंडेशनचे संस्थापक व सामाजिक कार्यकर्ते देविदास गुडघे व कार्यकर्त्यांनी केली आहे. (JCB works by showing bogus forest workers Demand for checkpoints for protection of wild animals Nashik News)

या प्रकरणी आज येथील वनविभागाच्या वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले आहे. देविदास गुडघेसह प्रवीण साबळे, महेश केरे, बाळासाहेब साबळे आदी उपस्थित होते.

जिल्यातील सर्वांना परिचित असलेल्या येवला तालुक्यातील पर्यटकांचे आकर्षण असलेल्या ममदापूर राखीव वनसंवर्धन क्षेत्र येवल्याच्या उत्तर- पूर्व भागातील हजारो हेक्टर विस्तीर्ण असे आहे.

या वनक्षेत्रातील हजारोंच्या संख्येने हरीण, काळवीट, मोर, लांडगा, नीलगाय विविध प्रकारच्या वन्यजीवांचा संचार आहे. निसर्गाने दिलेला या भागातील एक मोठा अनमोल ठेवा आहे. मात्र यापूर्वी या जंगलात अनेकदा हरणांच्या शिकारीचे प्रकार घडले असून उघडकीस देखील आले आहेत.

निसर्गाची देणगी असलेल्या या भागातील वन्य प्राण्यांचे संरक्षण होणे अत्यंत गरजेचे आहे. या भागातील वन्य प्राण्यांचे संरक्षण होण्यासाठी ममदापूर येथील चौफुलीवर वनविभागाची एक संरक्षक चौकी होणे अत्यंत गरजेचे आहे.

ममदापूरमार्गे छत्रपती संभाजीनगर, वैजापूर, अंदरसूल, येवला, मनमाड, नांदगाव मार्गाला जोडून आहे. जवळचा मार्ग म्हणून ममदापूरमार्गे रहदारी असते. त्यामुळे नेहमी घात, अपघात घडत असतात.

त्यामुळे वन्यप्राण्यांच्या संरक्षणाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. ममदापूर संवर्धन क्षेत्रातील वन्य प्राण्यांचे संरक्षण होणे अत्यंत गरजेचे असल्याने ममदापूर येथील चौफुलीवर वनविभागाची संरक्षक नेमून चौकी उभारण्यात यावी.

जेणेकरून वन्य प्राण्यांचे रक्षण होईल. विविधता टिकवून ठेवणे हे वन्य जिवांच्या रक्षणाचे परंपरागत उद्दिष्ट असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

JCB works by showing bogus forest labor in Mamdapur forest area? Demand for inquiry, demand for post for protection of wild animals
Nashik News: जलआंदोलनाला संत विचारांचा आधार! देवदरी येथे जलसंकिर्तन परिषद

Nashik News: जलआंदोलनाला संत विचारांचा आधार! देवदरी येथे जलसंकिर्तन परिषद


कर्मचारी निवासी नाहीत

राजापूर येथे वन विभागाची वसाहत असून येथे निवासी नेमणूक असताना या ठिकाणी एकही कर्मचारी वसाहतीमध्ये कर्मचारी राहत नाही, त्यामुळे वसाहत धूळखात पडली आहेच, पण अधिकाऱ्यांच्या अपडाऊनच्या खेळात वन्यप्राण्याच्या सुविधा व वनहद्दीच्या विकासाला अडथळे येत आहेत.

वनहद्दीत साधी पेट्रोलिंगही होत नाही. राखीव क्षेत्र झाल्याने शासनाने येथील विकासासाठी कोट्यवधीचा निधी वेळोवेळी दिला आहे. मात्र राजापूर ममदापूर संवर्धनमध्ये रोजगार हमीचे तसेच मजुरांकडून केली जाणारी कामे जेसीबीने केली आहेत.

अनेक कामे तर फक्त मजूर दाखवून कागदोपत्रीच होतात की काय अशी शंका या भागातील नागरिकांना असून तशी भीती व्यक्त होत आहे असेही निवेदनता म्हटले आहे. राखीव वन संवर्धनाच्या निधीमध्ये बराच गैरव्यवहार झाल्याची चर्चा आहे.

या प्रकरणाची वरिष्ठांकडून चौकशी करण्यात यावी व या जंगलाच्या विकासासाठी व वन्य प्राण्यांच्या सुरक्षेसाठी सर्व गैरप्रकारांची चौकशी केली जावी अशी मागणी गुडघे यांनी केली आहे.

"शासनाचा हेतू व येणारा कोट्यवधीच्या निधीचा पूर्णतः दुरुपयोग सुरू आहे. अधिकारी, कर्मचारी निवासी राहत नाही, पेट्रोलिंगही होत नाही. या भागातील वनजंगल व तेथील वन्यसंपदा आमच्यासाठी भूषण आहे. वन्यप्राणी देखील पूर्णता सुरक्षित नाहीत. त्यामुळे सर्व निधी योग्य पद्धतीने खर्च होणे गरजेचे असून येथे झालेल्या वेगवेगळ्या कामातील सर्व गैरप्रकाराची चौकशी होण्याची गरज आहे. येथे न्याय न मिळाल्यास आम्ही वनमंत्र्यांपर्यंत दाद मागणार असून प्रसंगी आंदोलन ही करू." - देविदास गुडघे, सामाजिक कार्यकर्ते, ममदापूर

JCB works by showing bogus forest labor in Mamdapur forest area? Demand for inquiry, demand for post for protection of wild animals
Anganwadi Recruitment: अंगणवाडी मदतनिसांच्या 96 जागा भरणार; सिन्नर तालुक्यात या तारखेपासून भरती प्रक्रिया

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()