Nashik News : इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, गुवाहाटी यांच्यातर्फे आयोजित ‘जेईई ॲडव्हॉन्स्ड- २०२३’ परीक्षेचा निकाल रविवारी (ता. १८) जाहीर झाला.
या परीक्षेत नाशिकच्या अभिषेक गुप्ता या विद्यार्थ्याने राष्ट्रीय क्रमवारीत १६६ वा क्रमांक पटकावला.
आर्य जोशी, अभिराज घुमरे, दुर्गेश शेळके यांनीही यशस्वी कामगिरी केली. या विद्यार्थ्यांसह अन्य विद्यार्थ्यांनी परीक्षेत यश मिळविताना ‘आयआयटी’मध्ये प्रवेशाचे स्वप्न साकार केले आहे. (JEE Advanced exam Abhishek rank 166th in country way to go to IIT open Nashik News)
शैक्षणिक वर्ष २०२३-२४ च्या प्रवेशासाठी आयआयटी व यांसारख्या राष्ट्रीय स्तरावरील अभियांत्रिकी संस्थांमध्ये प्रवेशासाठी पहिल्या टप्प्यात जेईई मेन्स परीक्षा घेण्यात आली होती.
या परीक्षेतून पात्रताधारक विद्यार्थ्यांना जेईई ॲडव्हान्स्ड परीक्षा देण्याची संधी उपलब्ध करून दिली होती. या महिन्यात ४ जूनला जेईई ॲडव्हान्स्ड परीक्षा झाली. निर्धारित वेळापत्रकानुसार रविवारी ऑनलाइन पद्धतीने निकाल जाहीर झाला.
या परीक्षेत नाशिकच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश मिळवताना आयआयटीमध्ये प्रवेशाचे आपले स्वप्न साकार केले आहे. यामध्ये अभिषेक गुप्ता याने ३६० पैकी २७४ गुण मिळवित राष्ट्रीय क्रमवारीत १६६ वा, तर नाशिकमध्ये पहिला येण्याचा मान पटकावला.
हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?
स्पेक्ट्रमचे ऐंशीहून जास्त विद्यार्थी
जेईई ॲडव्हॉन्स्ड परीक्षेत स्पेक्ट्रमच्या ८० पेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी घवघवीत यश मिळविले आहे. यशस्वी विद्यार्थ्यांमध्ये २७ विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय क्रमवारीत दहा हजारांच्या आत क्रमांक पटकावला आहे.
यशस्वी विद्यार्थ्यांमध्ये अभिराज घुमरे (५५१ क्रमांक), दुर्गेश शेळके (१२८२), पार्थ आहेर, १५३५), सानिका ब्राह्मणकर (२३५५), परम पाबरी (३०३४), निनित हिरे (३५३१), गौरीष खोडके (३७९८), मुकुंद आहेर (३८५५), मिहीर वाणी (४०८२), आदिती तापसे (४९७७) यांचा समावेश आहे. यशस्वी विद्यार्थ्यांचे स्पेक्ट्रमचे संचालक कपिल जैन व सर्व शिक्षकांनी अभिनंदन केले.
‘रेझोनन्स’ च्या विद्यार्थ्यांची बाजी
‘रेझोनन्स’च्या नाशिक शाखेतील विद्यार्थ्यांनी घवघवीत यश मिळविले. यामध्ये अभिषेक गुप्ता या विद्यार्थ्याने राष्ट्रीय क्रमवारीत १६६ वा क्रमांक पटकावला. आर्य जोशी याने राष्ट्रीय क्रवारीत ५३६ स्थान पटकावतांना यशस्वी कामगिरी केली. कौशल मोराणकर (१०४२), ओझस पाठक (२२०८), शिवम शानकर (४९७५), तनिषा हासे (७११४) या विद्यार्थ्यांनी यशस्वी कामगिरी केली. विद्यार्थ्यांना केंद्रप्रमुख मनीष शंकर यांच्यासह शिक्षक स्वप्नील जैन, शिवाजी भोसले, साकेत राज यांचे मार्गदर्शन लाभले.
‘ग्रॅव्हीटी’च्या विद्यार्थ्यांचे यश
येथील ग्रॅव्हीटी ॲकॅडमीच्या विद्यार्थ्यांनी परीक्षेत यशस्वी कामगिरी केली. यामध्ये तेजस देशमुख याने राष्ट्रीय क्रमवारीत एक हजार ६५९ वा क्रमांक पटकावला. समीरण निकम (४२००), सिद्धांत जेजूरकर (११०००), ओंकार म्हस्के (१५१०५) यांच्यासह सर्वेश नागरे, रजत भदाणे, श्रेयस शिंदे, क्रिश धेनिया, प्राची सावंत या विद्यार्थ्यांनी यश मिळविले. विद्यार्थ्यांना विश्वास जैन, संग्राम यादम यांचे मार्गदर्शन लाभले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.