Nashik Crime News : मुंबई-नाशिक मार्गावरील माणिकखांब-मुंढेगाव शिवारात पहाटे चोरट्यांनी चारचाकी वाहन अडवून, चालकाच्या डोळ्यात मिरची पूड टाकून व लोखंडी रॉडचा धाक दाखवून सोन्याच्या बिस्किटांची जबरी चोरी केली.
मार्गावरील बंद पडलेले पथदीप व हायमास्ट, निर्जन वस्ती असल्याने मुंढेगाव परिसरात चोऱ्यांच्या घटना वाढल्या आहेत. (Jewellery worth three and half crore stolen from car nashik crime news)
मुंबईवरून नाशिककडे जाणाऱ्या कार (एमएच १२, युजे ७९४८)ला मुंढेगाव शिवारात गुरुवारी (ता. १८) मध्यरात्री तीनच्या सुमारास तोंडाला रुमाल बांधलेल्या पाच ते सहा जणांनी अडविले.
त्यांनी चालकाच्या डोळ्यात मिरचीची पूड टाकली. चालकाला मारहाण करून वाहनातील एक किलो १०० ग्रॅमचे ११ सोन्याचे बिस्किटे, तीन किलो ४०० ग्रॅमचे सोन्याचे दागिने, ९० किलोच्या चांदीच्या तीन विटा, ४५ किलो चांदीचे दागिने व मोबाईल, असा एकूण तब्बल तीन कोटी ६७ लाख, ५५ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरट्यांनी हिसकावून पोबारा केला.
चालकाने घोटी पोलिस ठाणे गाठत आपबीती सांगितली. याबाबत गोपालकुमार अशोक कुमार (वय २०, रा. धुरा, ता. किरावली, जि. आग्रा) याने दिलेल्या फिर्यादीवरून घोटी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. घोटी पोलिसांनी महामार्ग, सर्व हॉटेल व रस्त्यांवरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासले.
घटनास्थळी पोलिस उपअधीक्षक सुनील भामरे, स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक हेमंत पाटील यांनी भेट दिली. पोलिसांनी घटनास्थळी पाहणी करून पंचनामा केला. पोलिस निरीक्षक विनोद पाटील तपास करीत आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.