जगण्याची वाट शोधत असताना समाजव्यवस्थेनं आखून दिलेल्या व्यवस्थेबाहेरील जीवन जगणं अवघड... समाजव्यवस्था आपल्याला स्वीकारत असताना अनेक प्रश्न समोर उभे असताना केवळ ज्या गावात जन्म झाला, त्या गावानेच माणुसकीचा पूल बांधत व्यवस्थेत उभं राहण्याचे बळ दिलं. हेच बळ आयुष्यात भक्कम करतानाच नशिबी आलेल्या विवंचनेतून मार्ग काढत आज स्वतःची ओळख अधोरेखित करतानाच समाजासाठी आदर्श ठरले आहेत ते वणी (ता. दिंडोरी) येथील दिलीपभाऊ गांगुर्डे...!
वणी येथील भास्कर गांगुर्डे यांच्या कुटुंबातील दिलीप यांचे तीन भावांचं कुटुंब... दिलीप यांचे शिक्षण दहावीपर्यंत... आई लक्ष्मीबाई आणि वडील भास्कर गांगुर्डे यांना कुटुंबाचा गाडा चालवण्यासाठी रोज मजुरी करण्याशिवाय पर्यायच नव्हता. कधी कधी दोन वेळचे जेवणही पोटभर मिळणे अवघड व्हायचे. आई- वडिलांच्या या कष्टमय वाटेवर मुलांनीही बालपणीच मजुरीची कामे करायला सुरवात केली. (jidd success story Dilip Gangurde underlining his identity Nashik Latest News)
मात्र व्यवस्थेला सामोरे जात असताना कुटुंबात जन्माला आलेला दिलीप म्हणजे व्यवस्थेपासून लांब असलेल्या घटकांपैकी एक सदस्य होता. इयत्ता सातवीत असतानाच वणी येथील सामाजिक कार्यकर्त्या नगमा शेख यांनी दिलीप यांना बळ दिलं. समाजाकडून मिळणाऱ्या वागणुकीकडे दुर्लक्ष करण्याचा सल्ला देतानाच त्यांना ब्यूटी पार्लरचं प्रशिक्षण देण्यासाठी पुढाकार घेतला.
अवघ्या खेळण्या- बागडण्याच्या वयातच दिलीप यांना व्यवस्थेमुळे सर्वांवर पाणी सोडावं लागलं. वयाच्या अकराव्या वर्षीच दिलीप यांनी पार्लर व्यवसायाचं प्रशिक्षण घेत कमाईचा भक्कम मार्ग शोधला. येथूनच खऱ्या अर्थाने व्यवस्थेला आव्हान देतानाच व्यवस्थाच बदलून टाकण्यासाठी दिलीप एक आदर्श ठरला.
कलाकारांचे मेकअप करण्याची संधी
शालेय जीवनापासून २०१३ पासून मेकअप आर्टिस्ट म्हणून स्वतःला सिद्ध करतानाच प्रसिद्ध सिनेअभिनेत्री उषा चव्हाण वणी शहरात आल्या होत्या, तेव्हा दिलीप गांगुर्डे यांनी त्यांचा मेकअप करण्याची आठवण सांगतानाच मकरंद अनासपुरे, निशा परुळेकर, अनिता खोपकर यांच्यासह अन्यही कलाकारांचा मेकअप करण्याची संधी मिळाल्याचे अभिमानाने सांगतात.
वणीवासियांमुळे मिळाला आधार
समाजात स्थान नसलेल्या व्यवस्थेचा भाग असलेल्या दिलीप यांची यशोगाथा थक्क करणारी.. आई- वडील, भावंडं आणि नगमा शेख यांच्यामुळे आज मी उपेक्षित व्यवस्थेचा सदस्य असतानाही आयुष्य सकारात्मक बनवू शकलो, असे सांगताना मात्र त्यांचा स्वर जड बनला होता. आज वणी शहराने दिलेल्या प्रोत्साहन आणि पाठबळामुळे व्यवस्थेवर मात करू शकलो, असेही दिलीप सांगायला विसरले नाहीत.
शालेय जीवनात सुरू झालेला ब्यूटी पार्लर व्यवसाय केवळ व्यवसाय म्हणून नाही तर इतरांसाठी दिलीप हे प्रेरणास्थान बनले आहेत. ब्युटी पार्लरच्या क्षेत्रात करिअर करतानाच कधीकाळी दिवसाला केवळ शंभर रुपयांची कमाई करणाऱ्या दिलीप यांनी आज मेकअप आर्टिस्ट म्हणून आर्थिक घडी बसवतानाच स्वतःची ओळख उभी केलीय. याशिवाय त्यांनी ब्युटी पार्लरचे प्रशिक्षण दिलेल्या अनेक मुलींनी स्वतःचे पार्लर सुरू केले आहेत. याशिवाय सामाजिक कार्यातही दिलीप यांचे नेहमीच योगदान राहिलंय.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.