Jitendra Awhad: ''स्टंटबाजी करताना जितेंद्र आव्हाडांनी बाबासाहेबांचा फोटो फाडला''; अजित पवार गट आक्रमक

Jitendra Awhad in nashik mahad: आव्हाडांकडून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो फाडला गेल्याचा आरोप आहे. यावरुन राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट आक्रमक झाला आहे.
Jitendra Awhad
Jitendra Awhad eSakal
Updated on

नाशिक- राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी नाशिक येथील चवदार तळ्यावर आंदोलन केले. यावेळी त्यांनी मनुस्मृतीचे दहन केले. यावेळी त्यांच्याकडून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो फाडला गेल्याचा आरोप आहे. यावरुन राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट आक्रमक झाला आहे.

आमदार अमोल मिटकरी यांनी आव्हाडांवर टीका केली आहे. जाहीर निषेध! जाहीर निषेध! स्टंटबाजीच्या नादात डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांनी महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे फोटो फाडलेत. स्टंटबाजीत आपण काय मूर्खपणा केला हेही आव्हाडांच्या लक्षात येऊ नये. आंबेडकर प्रेमी म्हणून या घटनेचा जाहीर निषेध! आव्हाडांनी तात्काळ देशाची माफी मागावी, असं ते म्हणालेत..

डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांनी महाडलाच बाबासाहेबांच्या जोड्यांवर नाक रगडून माफी मागावी अन्यथा याचे तीव्र पडसाद उमटलेले दिसतील, असंही ते म्हणाले आहेत.

Jitendra Awhad
Jitendra Awhad: 'हमारे बारह' चित्रपटाला जितेंद्र आव्हाडांकडून विरोध; कारण काय? जाणून घ्या
Jitendra Awhad
'शरद पवारांनी भाजपला पाठिंबा दिला होता, ती जर सुपारी होती तर आमचीही..'; आव्हाड, राऊतांच्या टीकेला मनसे आमदाराचं प्रत्युत्तर

जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात अजित पवार गट आक्रमक झाला आहे. आव्हाड यांनी थोर महापुरुषाचा अपमान केला आहे. त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल व्हावा अशी मागणी अजित पवार गटाच्या नेत्यांनी केला आहे. जितेंद्र आव्हाड यांचा निषेध म्हणून महाडमध्ये अजित पवार गटाकडून आंदोलन करण्यात येत आहे. या प्रकरणावरुन राजकीय वातावरण तापण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

जितेंद्र आव्हाड यांची प्रतिक्रिया

भावनेच्या भरात मनुस्मृती त्यावर लिहिलं होतं म्हणून ते पोस्टर फाडले. त्यावर बाळासाहेबांचा देखील फोटो होता. मला हे लक्षात आलं नाही. यावरुन विरोधक राजकारण करणारच. माझ्या हातून चूक झाली. मी याबाबत माफी मागतो. मनुस्मृती दिसलं म्हणून मी पोस्टर फाडलं. त्यावर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो आहे म्हणून तो फाडला असं कोणी म्हणत असेल तर तो मुर्ख आहे, अशी प्रतिक्रिया जितेंद्र आव्हाड यांनी दिली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.