NMC News: नोट प्रेसच्या मालमत्ता मोजमापासाठी संयुक्त पथक; सोमवारपासून 5 हजार एकरावरील मिळकतीचे सर्वेक्षण

nmc
nmcesakal
Updated on

Nashik News : नाशिक रोड येथील करन्सी नोट प्रेस (सीएनपी) व इंडिया सिक्युरीटी प्रेस (आयएसपी) त्याचप्रमाणे गांधीनगर प्रेसच्या मालमत्तांचे सोमवार (ता. ९) पासून सर्वेक्षण केले जाणार असून, त्यासाठी महापालिकेचा करवसुली विभाग, नगररचना व बांधकाम विभाग तसेच नोट प्रेसच्या संयुक्त पथकामार्फत पंधरा दिवसात सर्वेक्षण केले जाणार आहे. (Joint Team for Asset Measurement of Note Press Income survey on 5 thousand acres from Monday Nashik News)

महापालिका हद्दीमध्ये केंद्र व राज्य सरकारचे मिळून ४३ कार्यालये आहेत. सरकारी कार्यालयांनादेखील महापालिकेचा मालमत्ता कर अदा करणे बंधनकारक आहे.

त्याअनुषंगाने महापालिकेच्या विविध कर विभागाने केंद्र सरकारच्या अखत्यारीत असलेल्या करन्सी नोट प्रेस (सीएनपी) व इंडिया सिक्युरिटी प्रेस (आयएसपी) या दोन्ही आस्थापनांना नोटीस पाठवून वीस कोटी रुपयांच्या मालमत्ता कराची मागणी केली आहे.

परंतु २००९ च्या शासन आदेशाचा संदर्भ देत केंद्र सरकारच्या आस्थापनांना मालमत्ता कर लागू होत नसल्याची भूमिका घेत याविरोधात न्यायालयातही दाद मागण्यात आली.

दोन्ही आस्थापना केंद्र सरकार पुरस्कृत महामंडळ असल्याने शासन निर्णय या दोन्ही आस्थापनांना लागू होत नसल्याचा दावा महापालिकेने न्यायालयात केला.

तर, याप्रकरणी अंतिम निर्णय होईपर्यंत या दोन्ही आस्थापनांकडून सेवाशुल्क आकारण्याचे निर्देश न्यायालयाने महापालिकेला दिले. त्यानुसार महापालिकेने वसुलीची प्रक्रीया सुरू करण्यात आली आहे.

nmc
NMC News: एका ‘कॉल’ने अभियंत्यांच्या चेहऱ्यावर तणाव! मुख्यालयात खळबळ; अधीक्षक अभियंता पदासाठी दूरध्वनीवरून ऑफर

महापालिकेचे आयुक्त डॉ. अशोक करंजकर यांच्या अध्यक्षतेखाली सीएनपी व आयएसपीच्या अधिकाऱ्यांसमवेत संयुक्त बैठक घेऊन सेवाशुल्क लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्याअनुषंगाने सीएनपी व आयएसपीच्या अधिकाऱ्यांसमवेत बैठक झाली.

कर उपायुक्त श्रीकांत पवार, नगररचना विभागाचे कार्यकारी अभियंता संजय अग्रवाल, नाशिक रोड विभागीय अधिकारी हरिश्चंद्र मदन यांनी अधिकाऱ्यांची भेट घेऊन सर्वेक्षणासंदर्भात चर्चा केली.

केंद्र सरकारच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करून सोमवार (ता. ९)पासून सर्वेक्षण सुरू करण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला.

चाळीस कर्मचारी करणार सर्वेक्षण

नगररचना व कर वसुली विभागातील आठ, महापालिकेच्या सर्वेअर एजन्सीचे बारा, प्रेस व्यवस्थापनाचे २० असे एकूण चाळीस कर्मचाऱ्यांचे पथक सर्वेक्षणासाठी नियुक्त करण्यात आले आहे.

पथकाच्या माध्यमातून जवळपास पाच हजार एकरावरील मिळकतीचे सर्वेक्षण केले जाणार आहे.

nmc
NMC News : महापालिकेत अभियंत्यांच्या एकाधिकारशाहीला हादरा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()