नाशिक : ‘नदी महोत्सवा’तून उलगडणार जीवनदायिनी गोदावरीचा प्रवास

मान्यवरांच्या उपस्थितीत बुधवारपासून महोत्सव
नाशिक गोदावरीचा प्रवास
नाशिक गोदावरीचा प्रवास
Updated on

पंचवटी : महाराष्ट्रासह अन्य दोन राज्यांची जीवनदायिनी असलेल्या ‘गोदावरी नदी’चा एकूणच प्रवास उलगडणारा ‘नदी महोत्सव’ बुधवार (ता. १५)पासून शहरात होत आहे. महोत्सवानिमित्त २१ डिसेंबरपर्यंत व्याख्यानांसह विविध कार्यक्रमांची मेजवानी नाशिककरांना मिळणार आहे.

नाशिककरांनी हा प्रवास जाणून घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी कार्यालय, पुरातत्त्व विभाग व इतिहास संशोधन मंडळातर्फे करण्यात आले आहे. महोत्सवाच्या पार्श्‍वभूमीवर सराफ बाजार परिसरातील सरकारवाड्याच्या दरबार हॉलमध्ये विविध कार्यक्रम होणार आहेत. त्यात वारसा फेरी व मान्यवरांची व्याख्याने आदी कार्यक्रमांचा समावेश आहे. आयोजकांतर्फे जारी करण्यात आलेल्या या महोत्सवाच्या वेळापत्रकानुसार बुधवारी सकाळी साडेसातला गोदेची वारसा फेरी काढण्यात येणार आहे. यात, गोदावरीचे अभ्यासक व पर्यावरणप्रेमी देवांग जानी, रमेश पडवळ हे गोदेच्या वारशाबाबत भाष्य करतील.

नाशिक गोदावरीचा प्रवास
जळगाव शहरातील समतानगरमध्ये तरुणाची आत्महत्या

देवमामलेदार यशवंतराव महाराज पटांगणावर होणाऱ्या या कार्यक्रमास जिल्हाधिकारी सूरज मांढरे प्रमुख पाहुणे असतील. त्यानंतर गुरुवारी (ता. १६) सायंकाळी साडेपाचला ‘नदी संस्कृती’ या विषयावर नदी अभ्यासक व तज्ज्ञ डॉ. प्राजक्ता बस्ते मार्गदर्शन करतील. शुक्रवारी (ता. १७) सायंकाळी साडेपाचला डॉ. कैलास कमोद ‘गोदाघाटावरचे नाशिक’ या विषयावर मार्गदर्शन करतील. शनिवारी (ता. १८) सकाळी सातला पक्षीमित्र व निसर्ग छायाचित्रकार प्रा. आनंद बोरा ‘गोदाकाठचे पक्षी जीवन’ या विषयावर मार्गदर्शन करतील. गोदाघाटावरील गाडगे महाराज धर्मशाळेत हा कार्यक्रम होईल.

सायंकाळी साडेपाचला केटीएचएम महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. व्ही. बी. गायकवाड ‘जलप्रदूषण’ या विषयावर भाष्य करतील. त्यानंतर रविवारी (ता. १९) सायंकाळी साडेपाचला इतिहास अभ्यासक चेतन राजापूरकर ‘प्राचीन नाण्यांमधील नदी’ या विषयावर मार्गदर्शन करतील. सोमवारी (ता. २०) सायंकाळी साडेपाचला ‘नाशिकची गोदावरी’ या विषयावर डॉ. शिल्पा डहाके मार्गदर्शन करतील. मंगळवारी (ता. २१) प्रा. डॉ. प्रमोद हिरे हे ‘ऊर्ध्व गोदावरी नदीवरील आधुनिक पूर : कारणे आणि परिणाम’ या विषयावर आपले मत मांडतील. ही सर्व व्याख्याने सरकारवाड्याच्या दरबार हॉलमध्ये होतील. नाशिककरांनी महोत्सवाचा आनंद घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.