नाशिक : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर व निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार, पोलिस आयुक्तांनी आयुक्तालयातील पोलिस ठाण्यांसह गुन्हे शाखा, वाहतूक शाखा, विशेष शाखेतील पोलिस निरीक्षकांच्या जम्बो बदल्या केल्या आहेत.
स्थानिक व तीन वर्षे पुर्ण केलेल्या अधिकाऱ्यांच्या बदल्या करताना, कार्यकारी पदावरील अधिकाऱ्यांना अकार्यकारी पदावर नियुक्त केले आहे.
यात २४ पोलीस निरीक्षकांसह २७ सहायक निरीक्षकांच्या बदल्या करण्यात आलेल्या आहेत. (Jumbo reshuffle in City Police Commissionerate Transfers of Inspectors Assistant Inspectors in view of upcoming Lok Sabha Nashik Police)
लोकसभा निवडणुकीची पडघम वाजू लागले आहेत. जानेवारी अखेरीस वा फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्याची दाट शक्यता आहे.
या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने विविध शासकीय विभागांमधील अधिकाऱ्यांच्या बदल्या किंवा जबाबदारीत बदल करण्याचे आदेश दिले आहेत.
गेल्या आठवड्यात ग्रामीण पोलिस दलातील अधिकाऱ्यांच्याही परिक्षेत्रात बदल्या करण्यात आल्या आहेत.
तर, पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांनी आयुक्तालयात झालेल्या बैठकीत पोलिस निरीक्षकांच्या बदल्यांचे आदेश जारी केले आहेत. बदलीपूर्वी अधिकाऱ्यांनी दिलेल्या पसंतीक्रमही विचारात घेण्यात आला.
पोलिस निरीक्षक....सध्याचे ठिकाण....बदलीचे ठिकाण
सोहन माछरे..... वाहतूक-२..... पंचवटी पोलीस ठाणे
प्रवीण चव्हाण.... देवळाली कॅम्प .....आडगाव प्रभारी पोलीस ठाणे
जितेंद्र सपकाळे...... पंचवटी..... उपनगर पोलीस ठाणे
सुभाष ढवळे.... .वाहतूक -१..... म्हसरूळ पोलीस ठाणे
रणजित नलवडे..... गुन्हे शाखा २....... सातपूर पोलीस ठाणे
तृप्ती सोनवणे..... भद्रकाली.....गंगापूर पोलीस ठाणे
दिलीप ठाकूर...... सरकारवाडा ......अंबड पोलीस ठाणे
अशोक शरमाळे..... आर्थिक गुन्हे .... इंदिरानगर पोलीस ठाणे
अनिल शिंदे .....पंचवटी......गुन्हे शाखा - २
प्रमोद वाघ..... अंबड ...... शहर आर्थिक गुन्हे
सुरेश आव्हाड.....आर्थिक गुन्हे ....सरकारवाडा पोलीस ठाणे
विद्यासागर श्रीमनवार....खंडणी विरोधी पथक....देवळाली कॅम्प पोलीस ठाणे
नितीन पगार..... इंदिरानगर ..... शहर आर्थिक गुन्हे
पंकज भालेराव....सातपूर .... शहर आर्थिक गुन्हे
श्रीकांत निंबाळकर...... गंगापूर .....विशेष शाखा
गणेश न्हायदे....... आडगाव ......विशेष शाखा
सुरेखा पाटील..... विशेष शाखा - सरकारवाडा दुय्यम
संजय पिसे - आर्थिक गुन्हे ........ भद्रकाली पोलीस ठाणे (दुय्यम)
ज्योती आमणे......महिला सुरक्षा..... पंचवटी पोलीस ठाणे (दुय्यम)
राकेश हांडे...... वाहतूक..... वाहतूक शाखा युनिट १
दिवाणसिंग वसावे..... एनडीपीएस ......वाहतूक शाखा युनिट २
महेंद्र चव्हाण...... विशेष शाखा..... बीडीडीएस
प्रकाश पवार...... वाचक शाखा.....नियंत्रण कक्ष
२७ सहायक निरीक्षकांचीही बदली
शहरातील २७ सहायक पोलिस निरीक्षकांच्याही जबाबदारीत बदल केले असून, यात मध्यवर्ती गुन्हे शाखेचे धर्मराज बांगर यांची वाचक शाखेत, नाशिकरोडचे हेमंत फड गुन्हे शाखेत, वाहतूकचे यतीन पाटील अंबड, गुन्हे शाखेचे किरण रौंदळ अंबड, प्रवीण सूर्यवंशी नाशिकरोडला तर वसंत खतेले, साजीद मन्सुरी व प्रमिला कावळे यांची गुन्हे शाखेत, भद्रकालीचे किशोर खांडवी वाहतूकमध्ये, गंगापूरचे नरेंद्र बैसाणे उपनगरला तर मुंबई नाक्याचे सोमनाथ गेंगजे यांची गंगापूर पोलिस ठाण्यात नियुक्ती केली आहे.
बदली करण्यात आलेल्या अधिकार्यांना तात्काळ नियुक्तीच्या जागी हजर होण्याचेही आदेश आयुक्तांनी दिले आहेत.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.