Inspirational News : इगतपुरी तालुक्यातील सर्वांत अवघड असलेली, सह्याद्री पर्वतरांगेत सर्वाधिक उंचीवरील असलेली, जायला रस्ताही नसलेली जूनवणेवाडी शाळा येथील मुख्याध्यापक वैभव गगे व सहकारी गोकुळ सूर्यवंशी यांच्या प्रयत्नांतून व कन्सर्न इंडिया फाउंडेशनच्या अर्थसहाय्यातून आता तालुक्यातील सर्वांत सुसज्ज शाळांपैकी एक बनली आहे. (June Wanewadi School has now become one of best equipped schools in taluka nashik news)
शाळेच्या विविध विकासकामांचे उद्घाटन कन्सर्न इंडियाच्या सदस्या अँना मॅडम, सॅण्ड्रा मॅडम यांच्या उपस्थितीत व सीनिअर शिक्षण विस्ताराधिकारी अशोक मुंढे, केंद्रप्रमुख विजय पगारे, सोमनाथ सोनवणे, धनराज म्हसणे यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले.
शाळेला मिळाले ऑफग्रीड सोलर सिस्टिम
वाडीवर जाण्यास रस्ताच नसल्याने पावसाळ्यात ट्रान्स्फॉर्मर खराब झाले तर पाच महिने वीज नसायची. आता शाळेला ऑफग्रीड सोलार सिस्टिमचे मोठे प्लान्ट कार्यान्वित करण्यात आल्याने २४ तास मुबलक वीज उपलब्ध झाली आहे. तसेच गावातही या संस्थेच्या माध्यमातून १० सोलर पॉइंट्स उभारण्यात आले असून, लवकरच या यशस्वी मॉडेलचा लाभ तालुक्यातील काही शाळांना देण्यात येणार आहे.
हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?
आरसीसी टॉयलेटसह २४ तास मिळणार पाणी
कन्सर्न इंडियाच्या वतीने येथील मुला-मुलींसाठी दोन आरसीसी टॉयलेट्स उभारण्यात आले आहेत. यात मुले व मुलींसाठी अत्याधुनिक अशी दोन स्वतंत्र टॉयलेट्स संस्थेच्या माध्यमातून उभारण्यात आले आहेत.
तसेच शाळेला स्वतःची यंत्रणा असलेली पाइपलाइन, मोटार व टाक्यांची २४ तास पाणीपुरवठा करण्याची सुविधा उभारण्यात आली असून, शाळेच्या छताला आकर्षक रंगाची पीयूसी सीलिंग करण्यात आली आहे. यासोबतच शाळेतील प्रत्येक विद्यार्थ्याला स्वतःच्या वैयक्तिक स्वच्छतेची सर्व साधने असलेले किट व एक बॅग आणि सर्वांना पॅरागॉन कंपनीचे सॅन्डल्स वितरित करण्यात आले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.