Junior Colleges Admission : विज्ञान शाखेकडे ओढा; कला, वाणिज्यसाठी विद्यार्थ्यांची शोधाशोध!

Junior Colleges Admission News
Junior Colleges Admission Newsesakal
Updated on

Nashik News : जिल्ह्यातील अकरावीच्या प्रवेशाचे वेळापत्रक जाहीर झाले असून, बुधवार (ता. १४)पासून प्रवेश अर्ज जमा करण्यास सुरवात होताच गर्दी उसळत आहे. विशेष म्हणजे शिक्षण विभागाच्या सूचनांचे पालन करून अकरावीची प्रवेशप्रक्रिया होणार आहे.

या वर्षी ५५ ते ६० टक्के मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांनाही विज्ञान शाखेलाच प्रवेश हवा असल्याने ‘कट ऑफ’ वाढेल, त्याचवेळी कला व वाणिज्य शाखेला विद्यार्थी शोधण्याची वेळ काही कनिष्ठ महाविद्यालयांवर येणार आहे. (Junior College Admission Student interested in Science Also Search for Arts Commerce stream Class XI admission schedule announced rush fill application Nashik News)

दहावीचा निकाल लागून विद्यार्थ्यांना गुणपत्रक मिळाले असल्याने अकरावीच्या प्रवेशासाठी धावपळ सुरू झाली आहे. नाशिक महापालिका क्षेत्र वगळता उर्वरित जिल्ह्यासाठी अकरावी प्रवेशाचे वेळापत्रक नाशिक विभागाचे शिक्षण उपसंचालक डॉ. बी. बी. चव्हाण यांनी जाहीर केले असून, बुधवारपासून (ता.१४) अकरावी प्रवेशप्रक्रिया सुरू होऊन अर्ज जमा केले जात आहेत.

जिल्ह्यासाठी ऑफलाइन पद्धतीने ‘बेस्ट ऑफ फाइव्ह’ गुणवत्तेनुसार प्रवेशप्रक्रिया राबविली जाणार आहे. मात्र कमी गुण असले तरी प्रवेश अर्ज नाकारता येणार नाही.

फक्त हवे सायन्स!

दहावीला भरभरून गुण मिळाल्याने अनेक विद्यार्थ्यांचा ओढा विज्ञान शाखेकडे आहे. त्यामुळे शहरासह ग्रामीण भागातील विज्ञान शाखांचे प्रवेश फुल होतील. त्याचवेळी कला व काही प्रमाणात वाणिज्य शाखा नकोच, अशी भूमिका असल्याने महाविद्यालयांना विद्यार्थी शोधण्याची वेळ या वेळी येत असल्याने गावोगावी शिक्षक चकरा मारत आहेत. विशेषत: शहरातील विज्ञान शाखेकडे मोठा ओढा असतो, त्याचवेळी ग्रामीण भागातील विज्ञान शाखेच्या काही जागा रिक्तही राहतात.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Junior Colleges Admission News
Sakal Education Expo : विद्यार्थी कशात घडविणार भवितव्य? बारामतीत आजपासून मार्गदर्शनाची संधी

"अर्ज स्वीकारणे सुरू होण्यापूर्वीच विज्ञान शाखेला प्रवेश घेण्यासाठी पालक व विद्यार्थी विचारणा करत आहे. विज्ञान शाखा शहरात, तर फुल होईलच; परंतु ग्रामीण भागातही जागा पूर्ण होतील. कला शाखेला मात्र या वर्षी विद्यार्थी मिळवताना कसरत करावी लागणार आहे. विज्ञान शाखेतून भविष्यात अनेक संधी असल्याने याकडे विद्यार्थ्यांचा कल अधिक आहे."

-गोरख येवले, प्राचार्य, संतोष कनिष्ठ विद्यालय, बाभूळगाव

■ असे असेल वैधानिक सामाजिक आरक्षण

अकरावी प्रवेशासाठी अनुसूचित जाती- १३, अनुसूचित जमाती- ७, विमुक्त जाती अ- ३, एनटी ब - २.५, एनटी क- ३.५, एनटी ड- २, विशेष मागासप्रवर्ग- २, इतरमागास प्रवर्ग - १९, आर्थिक दुर्बल घटक- १०, इन हाउस कोटा- १०, अल्पसंख्यांक कोटा ५०, व्यवस्थापन कोटा पाच टक्के असणार आहे. सर्व महाविद्यालयांना त्याचे पालन करावे लागेल.

Junior Colleges Admission News
Education Hub : वाकड-ताथवडे, रावेत-किवळे ‘एज्युकेशन हब’ म्हणून येत आहे उदयास

● प्रवेशाचे वेळापत्रक

■ प्रवेश अर्ज वितरण व जमा करणे- १४ ते १७ जून

■ अर्ज छाननी, संवर्गनिहाय गुणवत्तायादी तयार करणे- २० जूनपर्यंत

■ पहिली संवर्गनिहाय गुणवत्तायादी व प्रतीक्षा यादी प्रदर्शित करणे- २१ जून (दुपारी चारपर्यंत)

■ पहिल्या गुणवत्ता यादीतील विद्यार्थ्यांना प्रवेश देणे- २२ ते २४ जून

■ रिक्त जागांवर दुसऱ्या, तिसऱ्या प्रतीक्षा याद्यांप्रमाणे प्रवेश देणे- २६ ते ३० जून

■ अंतिम प्रवेश यादी जाहीर करणे- १ जुलै

Junior Colleges Admission News
Nashik Teacher Transfer : शिक्षकांच्या प्रलंबित आंतरजिल्हा बदल्या टप्प्याने करण्यास सरकार सकारात्मक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.