पूजा लोंढे हत्या प्रकरण : माहेर सिन्नरमध्ये तीव्र आक्रोश

puja londhe
puja londheesakal
Updated on

सिन्नर (जि.नाशिक) : पूजाला न्या द्या, नराधमांना कठोर शिक्षा द्या‘ अशा मजकुराचे फलक घेऊन सिन्नरकर रस्त्यावर उतरले होते. अवघ्या पाच महिन्यापूर्वी विवाह झालेल्या सिन्नरचे माहेर असलेल्या पूजा लोंढे-मेहेत्रे हीची कुंभारी (ता. कोपरगाव) येथे तिच्या सासरच्यांनी जाळून हत्या केली आहे असा आरोप करीत कोपरगाव पोलिसांनी तातडीने याची दखल घ्यावी, गुन्हेगारांना कठोर शिक्षा व्हावी या मागणीसाठी शनिवारी (ता.३१) शहरातील विविध संघटनांनी सकाळी तहसील कार्यालयावर मोर्चा तसेच सायंकाळी कॅंडल मार्च काढला होता.(justice-for-burned-Pooja-londhe-sinner-marathi-news-jpd93)

दोन लाखांसाठी जाळले

पूजाने घर बांधण्यासाठी माहेरून दोन लाख रुपये आणावेत यासाठी तिचा छळ करण्यात येत होता. मानसिक,व शारीरिक तसेच शिवीगाळ करत २६ जुलैला सासरच्यांनी तिला पेटवून दिले होते. त्यात ती ९० टक्के भाजली होती. लोणी येथील ग्रामीण रुग्णालयात तिच २८ जुलैला उपचार सुरू असताना निधन झाले. पूजाला न्याय मिळायलाच हवा अशी मागणी करण्यात आली. पूजाला न्या द्या, नराधमांना कठोर शिक्षा द्या‘ अशा मजकुराचे फलक घेऊन क्रांतिसूर्य प्रतिष्ठान, शिवसेना तसेच प्रहार जनशक्ती पक्षाचे कार्यकर्ते सहभागी झाले होते.

puja londhe
नाशिककरांनो सतर्क राहा! गोदावरीत विसर्ग, पूराचा धोका

पूजाच्या सासरच्यांवर सिन्नरला गुन्हा

कोपरगाव पोलिसांनी या प्रकरणी दखल घेण्यास टाळाटाळ केल्याने पूजाला जाळून मारणा-या संशयितांवर तातडीने गुन्हे दाखल करावे या मागणीचे निवेदन भारतीय जनता पक्षातर्फे कोपरगाव पोलिस ठाण्याचे निरीक्षक देसले यांना देण्यात आले. त्यानंतर पोलिसांनी विवाहितेचे वडिल पांडुरंग रामभाऊ लोंढे (रा. लिंगटांगवाडी) यांच् तक्रारीवरुन कुंभारी येथील पूजाचा नवरा निखिल मेहेत्रे, सासरा विलास मेहेत्रे, सासू लता मेहेत्रे, दीर आशिष व स्वप्निल मेहेत्रे, जाऊ रेखा स्वप्निल मेहेत्रे यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

कठोरात कठोर शिक्षा व्हावी यासाठी सिन्नरला मोर्चा

मोर्चातर्फे तहसीलदार राहुल कोताडे व सहाय्यक पोलिस निरीक्षक विजय माळी यांना लेखी निवेदन देण्यात आले. शिवसेनेचे शहरप्रमुख गौरव घरटे, भाजपचे तालुकाध्यक्ष बाळासाहेब हांडे, मनसेच्या महिला आघाडीप्रमुख अॅड.भाग्यश्री ओझा, प्रहारचे तालुकाध्यक्ष शरद शिंदे, अरुण पाचोरे, कैलास दातीर, अन्याय अत्याचार निर्मुलन संघटनेचे संदीप भालेराव, शिवसेनेचे नगरसेवक रुपेश मुठे, उदय गोळेसर आदींसह असंख्य महिला व पुरुष कार्यकर्ते मोर्चा व कॅंडल मार्चमध्ये सहभागी झाले होते.

puja londhe
नाशिक : विंचूरमध्ये सरदार विठ्ठल नरसिंहांच्या समाधीचा शोध?

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()