मालेगाव (जि. नाशिक) : येथील वरिष्ठ स्तर दिवाणी न्यायाधीश तेजवंतसिंह संधू यांनी संसाराच्या जुळविल्यात गाठी. गेल्या चार महिन्यांत त्यांनी चार जोडप्यांची समजूत काढत एकत्र आणलं. त्यामुळे घटस्फोटाच्या उंबरठ्यावर पोचलेले संसार पुन्हा रूळावर आले आहेत. (Justice Tejwant Singh Sandhu reconciled 4 couples in Malegaon in 4 months Nashik News)
जिल्हा न्यायालयात संसार सुखाचा व्हावा, तसेच आपापसांतील वाद मिटविण्यासाठी अनेक जोडपे दावा दाखल करतात. तसेच महिलांना सासरी मानसिक-शारीरिक छळ, पैशांची मागणी, लग्नात हुंडा यांसारखे गुन्हे दाखल केलेले असतात. न्यायासाठी प्रदीर्घ प्रतीक्षा करावी लागते. त्यात दांपत्याचे नुकसान होते. अपत्य असल्यास ते कोणातरी एकाच्या मायेला पारखे होते. दुभंगलेली नाती पुन्हा जुळविण्यासाठी श्री. संधू यांनी पुढाकार घेतला आहे. मुळातच, लग्नाचे नाजूक बंधन फार हळवे असतात. ते टिकले नाहीत, तर आयुष्यभर त्रासाला सामोरे जावे लागते. त्यातच कायद्याचा सर्वसामान्य माणसाला धाक वाटतो, तोच कायदा जोडप्यांना आधार ठरला आहे.
श्री. संधू यांनी मोडकळीस व घटस्फोटला आलेले संसार जोडण्याचे काम केले आहे. त्यांनी चार महिन्यांत दोन्ही बाजूंची समजूत काढत, जोडप्यांना एकत्र आणले. महिलांना पुन्हा नांदण्यास पाठविले. त्यातील एकाचा सात, दोघांचा पाच, चौथ्याचा दोन वर्षांपासून दिवाणी न्यायालयात खटला सुरू होता. श्री. संधू यांनी या जोडप्यांना आपल्या चेंबरमधील देवापुढील फूल देऊन संसाराची घडी जुळविली. त्यांनी या जोडप्यांना समाजासमोर आदर्श जोडीची शपथ घेण्यास सांगितली. अनेक वर्षे एकमेकांपासून दुरावलेल्या हे चारही जोडप्यांनी घटस्फोटाचा मार्ग सोडला. श्री. संधू यांच्या मार्गदर्शनामुळे पुन्हा संसार थाटण्याचा निर्णय घेतला आहे.
अनुकूल दांपत्य जीवन स्वर्गासारखे
दाम्पत्यमनुकूलं चेत्किं स्वर्गस्य प्रयोजनम् ।
दाम्पत्यं प्रतिकूलं चेन्नरकं किं गृहमेव तत् ॥
संस्कृत श्लोक आहे. अर्थात, मनुष्याचे दांपत्य जीवन अनुकूल असल्यास स्वर्गाचे काय प्रयोजन? आणि जर मनुष्याचे दांपत्य जीवन प्रतिकूल असल्यास नरक कोणता आहे? ते घरच नरक होऊन जाते.
"आमच्या दोघांच्या भांडणात आमचा लहान मुलगा जयशिव आई-बापाच्या मायेपासून वंचित राहिला होता. ‘तोडो नही जोडो’ या वाक्याची प्रचीती आम्हा दोघांना न्यायाधीश तेजवंतसिंह संधू यांच्या न्यायालयात आली. त्यामुळे मी आणि माझी पत्नी आरती आमचा मुलगा जयशिवसोबत गेल्या चार महिन्यांपासून सुखाचा संसार करीत आहोत."
- आरती व अमोल आहिरे (टेहेरे)
"किरकोळ वाद, भांडण-तंटे न्यायालयाऐवजी मध्यस्थ करून मिटविले पाहिजे. विश्वास, श्रद्धा, समर्पण, प्रेम हे प्रामाणिकपणे निभावल्यास कौटुंबिक वादासाठी न्यायालयाची गरज भासणार नाही." - तेजवंतसिंह संधू, दिवाणी न्यायाधीश, वरिष्ठ स्तर मालेगाव
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.