Nashik Agriculture News: कादवा कारखाना उपलब्ध करणार बांधावर रासायनिक व कंपोस्ट खत

fertilizer
fertilizeresakal
Updated on

Nashik Agriculture News : कादवा सहकारी साखर कारखान्याने ऊस लागवड वाढण्यासाठी विविध ऊस विकास योजना सुरू केल्या आहेत.

कारखान्याने उधारीवर इफ्को कंपनीचे 10.26.26 व युरिया रासायनिक खत व कंपोष्ट खत बांधापर्यंत पोहोच करण्याची सेवा उपलब्ध केली आहे. शेतकऱ्यांनी त्याचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे. ( Kadwa factory will provide chemical and compost fertilizer to farmers Nashik Agriculture News)

fertilizer
Helmet Special Drive : सावधान.. 2042 विना हेल्मेट चालकांवर दडुंका! वाहतूक पोलिस अलर्ट

कार्यक्षेत्रातील ज्या ऊस उत्पादक सभासद शेतकऱ्यांनी हंगाम 2023-24 साठी ऊस लागवड करून कारखान्यामध्ये नोंद केलेली आहे, अशा शेतकऱ्यांना उधारीने हेक्टरी 4 गोण्या 10.26.26 इफ्को खताचे व 5 गोणी युरिया वाटप कारखान्यामार्फत प्रत्येक सेंटरवर करण्यात येत आहे.

नोंदणी केलेल्या ऊस उत्पादकांनी आपल्या जवळच्या सेंटरवर संपर्क साधून इफ्को कंपनीचे खत घेऊन जाण्याचे आवाहन कारखान्याचे अध्यक्ष श्रीराम शेटे यांनी केले आहे. हेक्टरी उत्पादनात वाढ व्हावी व त्याचप्रमाणे कार्यक्षेत्रातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांची मागणी लक्षात घेता प्रति वर्षाप्रमाणे यंदाही ही योजना कारखान्यामार्फत राबविली जात आहे.

यापूर्वी कारखान्यामार्फत स्पेंन्टवॉश प्रेसमड व कल्चर यांचे योग्य पद्धतीने मिश्रण करून उच्च प्रतिचे कंपोष्ट खत निर्मिती केली आहे. त्याला शेतकऱ्यांचा उत्तम प्रतिसाद लाभला आहे. या कंपोष्ट खताबरोबरच रासायनिक खताचे देखील वाटप सुरु होत असल्याने कादवा कारखान्याचे ऊस उत्पादक सभासद शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केलेले आहे

fertilizer
Nashik Traffic Problem: शालिमार चौकाला रिक्षाचालकांचा विळखा! वाहतुकीला होतोय अडथळा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.