Nashik News : कालिदास कलामंदिराचे व्यवस्थापक कहाणे निलंबित; 4 कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस

Suspension
Suspension esakal
Updated on

Nashik News : कालिदास कलामंदिरातील वातानुकूलित यंत्रणा बंद पडल्यानंतर उडालेला गोंधळ व त्यापूर्वीच काळजी न घेतल्याचा ठपका ठेवत महाकवी कालिदास कलामंदिराचे व्यवस्थापक जगन्नाथ कहाणे यांच्यावर प्रशासनाने निलंबनाची कारवाई केली आहे.

कालिदास कलामंदिरातील गोंधळ संदर्भात वरिष्ठांना माहिती न दिल्याने चार कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली असून, त्यांच्याकडून खुलासा मागविण्यात आल्याची माहिती प्रशासन उपायुक्त मनोज घोडे- पाटील यांनी दिली. (Kalidas Kalamandir manager Kahane suspended 4 Show cause notice to employees Nashik News)

Suspension
Sanjay Raut : कुरुलकर प्रकरणावरून लक्ष हटविण्यासाठी दंगली; खासदार राऊत

१४ मेस महाकवी कालिदास कलामंदिरात कार्यक्रम सुरु असताना वातानुकूलित यंत्रणा अचानक बंद पडली. त्यातून गोंधळ उडाला. प्रेक्षकांना मानसिक त्रास सहन करावा लागल्याने त्यातून तक्रारी झाल्या.

महापालिकेचे प्रभारी आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी या प्रकरणी चौकशीच्या सूचना दिल्या. त्यात घटना घडली, त्या वेळी संबंधित अधिकारी जागेवर नसल्याचे स्पष्ट झाले. व्यवस्थापक कहाणे हे रजेवर असल्याची माहिती समोर आली.

परंतु रजेवर जाताना त्यांनी अन्य अधिकाऱ्याकडे पदभार सोपविला नसल्याने जबाबदारी निश्चित करण्याच्या सूचना गमे यांनी दिल्या. कालिदास कलामंदिरातील देखभाल दुरुस्तीच्या ठेक्याची मुदत डिसेंबर महिन्यात संपुष्टात आल्याने तीन महिने आधीचं निविदा प्रक्रिया राबविण्याची आवश्‍यकता होती. कर्तव्यात कसूर केल्याने कहाणे यांच्यावर ठपका ठेवत निलंबनाची कारवाई करण्यात आली.

Suspension
Trimbakeshwar: गोमूत्र शिंपडत ‘बम बम भोले'चा गजर अन महाआरती; सर्व पक्षिय बैठकीत शांतता अबाधित राखण्याची सूचना

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.