Health: आदीवासींचा कल्पवृक्ष आरोग्यासाठीही गुणकारी; मोहाच्या बियांपासून बनविलेल्या तेलाचा आहारात वापर

Mohache tel
Mohache telesakal
Updated on

Health : सह्याद्रीच्या जंगल परिसरात हमखास आढळणारा व आदिवासींचा कल्पवृक्ष म्हणून ख्याती पावलेला बहुउपयोगी मोह वृक्ष व त्याच्या बियांपासून बनवले जाणारे खाद्यतेल आरोग्यासाठी गुणकारी आहे. (Kalpavriksha of Adivasi also good for health Dietary use of moha fruit oil nashik news)

फुलांचा बहर ओसरल्यावर जून-जुलै दरम्यान परिपक्व होणाऱ्या बीया गोळा करून आदिवासी नागरिक त्या फोडून उन्हात वाळवून सुकवतात. यांत्रिकी घाण्यातून या बियांचे तेल काढून घरात खाद्यतेल म्हणून आदिवासी बांधव मोठ्या प्रमाणात वापर करताना दिसतात.

त्यामुळेच आदिवासींच्या घरी व लग्नसोहळ्यांतही जेवणाची चव जिभेवर रेंगाळत राहते. घाण्यामधून तेल काढल्यावर त्यात कडवटपणा राहतो. तो कमी करण्यासाठी नागलीची पाने टाकून व उकळून ते थंड करून स्टीलच्या अथवा प्लास्टिक ड्रममध्ये साठवले जाते.

वर्षानुवर्षे ते खराब होत नाही. पालघर, ठाणे, नाशिक, अकोले, जव्हारसह अनेक ठिकाणी खाद्यतेल म्हणूनही याचा वापर केला जातो. याबाबत चिंचले खैरे (ता. इगतपुरी) येथील श्रावण भगत हे वयोवृद्ध सांगतात की, आम्ही बाजारात मिळणारे तेल वापरत नाही.

सध्या ७५ वर्ष वय असूनदेखील कोणत्याही प्रकारची गोळी अथवा औषध आजपर्यंत सुरू केलेली नाही. आम्ही या तेलाचा कांजण्या, गोवर, फोड, चर्म रोग, डोकेदुखी, सांधेदुखी आदींसाठीही वापर करतो.

मोहाच्या पेंडीचा धूर केल्यास साप आणि घर व परिसरातील उपद्रवी किडे-कीटक पळतात. धुरामुळे वातावरण शुद्ध होते. असा अनुभव सांगताना त्यांनी सरकारने त्यासाठी मदत करावी अशी मागणी ‘सकाळ’च्या माध्यमातून नोंदविली. राज्य सरकार व वनविभागाने याकरिता पुढाकार घेवून प्रक्रिया उद्योगांना चालना देणे गरजेचे असल्याचेही त्यांनी सांगितले.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Mohache tel
Water Crisis : पंचवटी गावठाण भागात दुसऱ्या दिवशीही हंडाभर पाण्यासाठी भटकंती

रासायनिक गुणधर्म..

क्रूड, प्रोटीन, फायबर, फॉस्फरस, राख, पोटाश व इतर प्रोटीन्स मोहाच्या बियांत मोठ्याप्रमाणावर आढळतात. बियांतून तेल काढल्यावर त्यांच्या चोथ्याची पेंड बनवतात. या पेंडीचा उपयोग खत म्हणून शेतात केला जातो.

पेंडीत पिकांना लागणारी पोषक द्रव्येदेखील भरपूर प्रमाणात असतात. सल्फेट व नायट्रोजन खतात पेंड मिसळून पिकांना घातली जाते. त्यामुळे पिकांची वाढ जोमदारपणे होते. मोहाच्या बियांपासून मिळणाऱ्या पेंडचा उत्तम सेंद्रिय खत म्हणून वापर केला जातोय.

तेल काढण्यासाठी कारेगाव, घोटी येथे जावे लागते. तेल घाण्यातून काढण्यासाठी किलोस १५ रुपये घेतात. बीया विक्रीस बाजारात २० ते ३० रुपये किलो असा भाव आहे.

"मोहाच्या तेलामध्ये मोठ्या प्रमाणात ए, इ, बी-१, बी-६ यांसह हायप्रोटीन पोषक घटक असल्यामुळे हृदयाची पंपिंग सुधारते. सांधेदुखी आदी विकारांवर उपयोगी आहे. बाजारातील प्रोसेसिंगमुळे तेलातील घटक कमी होतात. त्याचा हृदयावर वाईट परिणाम होतो. त्यामुळे आदिवासींची जीवनशैली पाहताना अधिक वयोमान, नेत्र व हृदय ठणठणीत राहते."

-डॉ. कविता उपाध्ये, आयुर्वेद तज्ज्ञ, घोटी

Mohache tel
Nashik News : खेडलेझुंगेत गोदापात्र पुन्हा झाले नितळ; सतत प्रवाहित जलस्त्रोतांतून साधला परिणाम

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()