Kamgar Kalyan Natya Spardha : खऱ्या कलावंताची धडपड मांडणारे ‘जुगाड’

Actors from Jalgaon performing scenes from the play 'Jugaad' at the drama festival of the Labor Welfare Board.
Actors from Jalgaon performing scenes from the play 'Jugaad' at the drama festival of the Labor Welfare Board.esakal
Updated on

नाशिक : कला जपणे अन् कलेचा प्रसार करण्यासाठी एका खऱ्या कलाकाराची धडपड मांडणारी नाट्यकृती म्हणजे ‘जुगाड’. महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या ६८ व्या नाट्य स्पर्धेत ल. क. भवन. शाहूनगर वसाहत, जळगावतर्फे हे नाटक सादर झाले. प्रदीप भोई यांनी नाटकाचे लेखन आणि दिग्दर्शन केले. (Kamgar Kalyan Natya Spardha Jugaad play showing struggle of true artist nashik news)

नाटक करणारा एक मुलगा नृत्य करणाऱ्या काही मुलांना जमा करतो आणि त्यांच्याकडून नाटक बसवून घेण्याचा प्रयत्न करतो. मात्र हे सर्व करताना नृत्य करणारी ही मंडळी जो त्रास देतात. यामुळे नाटक बसविताना या तरुणाची फजिती होते.

मात्र एवढे सर्व असतानाही नाटक बसविण्याची जिद्द अन् धडपड खऱ्या कलावंताच्या कलेवरील निस्सीम श्रद्धा अन् कृतज्ञता अधोरेखित करते. गंभीर विषयाची केलेली विनोदी मांडणी उल्लेखनीय आहे. त्यामुळे प्रेक्षकांना निखळ मनोरंजनासोबत कलाकाराच्या जीवनाचा प्रवास अनुभवता येतो.

हेही वाचा : योग्य वेळेतच करा इच्छापत्र आणि व्हा चिंतामुक्त

Actors from Jalgaon performing scenes from the play 'Jugaad' at the drama festival of the Labor Welfare Board.
Winter Disease : वातावरण बदलाचा परिणाम आरोग्यावर; सर्दी, खोकला, ताप यांसारखे आजाराने वाढवली चिंता!

प्रदीप भोई, राज अंभोरे, सुमीत राठोड, विनोद बनसोडे, मयूर पवार, रोहित अंभोरे, कल्याणी ताडगे, पूनम छडीकर, प्रांजल पंडित, गोपाल जोशी, उज्ज्वल कचरे, मयूर जोशी, खुशवंतकुमार मराठे, नितीन भालेराव, ओम सोनवणे, मुस्कान तडवी, रिया बनसोडे, संदीप मोरे या कलावंतांनी या नाटकात भूमिका साकारल्या. नाटकाचे नेपथ्य रीना जाधव यांनी तर प्रकाशयोजना महेंद्र खेडकर यांनी साकारली. संचित सपकाळे यांनी नाटकाला पार्श्वसंगीत दिले. पात्रांच्या रंगभूषा रुचिता जाधव तर वेशभूषा विशाखा सपकाळे यांनी साकारल्या.

आजचे नाटक

स्पर्धेत सोमवारी (ता. ९) ललित कला भवन, जळगाव तर्फे ‘दिशा’ हे नाटक सादर होणार आहे. शरद भालेराव या नाटकाचे लेखक असून चिंतामण पाटील दिग्दर्शक आहेत.

Actors from Jalgaon performing scenes from the play 'Jugaad' at the drama festival of the Labor Welfare Board.
Nashik News : अभोणा परिसरात टोमॅटोऐवजी मिरचीला प्राधान्य

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.