Kamgar Kalyan Natya Spardha: संसाराचा सारीपाट ‘हम दो नो’

पती- पत्नीच्या संसारातील अनपेक्षित घटनांचा सारीपाट मांडणारी नाट्यकृती ‘हम दो नो’. ६९ व्या कामगार कल्याण नाट्य स्पर्धेत ललित कला भवन, जळगावतर्फे मंगळवारी (ता. २३) सादर झाले.
An episode from Parashuram Saikhedkar theater play 'Hum Do No'
An episode from Parashuram Saikhedkar theater play 'Hum Do No'esakal
Updated on

नाशिक : पती- पत्नीच्या संसारातील अनपेक्षित घटनांचा सारीपाट मांडणारी नाट्यकृती ‘हम दो नो’. ६९ व्या कामगार कल्याण नाट्य स्पर्धेत ललित कला भवन, जळगावतर्फे मंगळवारी (ता. २३) सादर झाले.

डॉ. हेमंत कुलकर्णी लिखित नाटकाचे अपूर्वा कुलकर्णी यांनी दिग्दर्शन केले. (Kamgar Kalyan Natya Spardha Saripat of world drama name Hum Do No nashik)

An episode from Parashuram Saikhedkar theater play 'Hum Do No'
Nashik: श्रीराम यागात 11 हजार श्रीराम गायत्री मंत्राची आहुती! सप्तशृंगी गडावर हजारो भाविक आदिमायेचरणी नतमस्तक

पती- पत्नीच्या संसारात अपत्याच्या प्राप्तीवेळी अनपेक्षित घटना अन् त्यातून येणारा संघर्ष कथानकातून लेखकाने मांडण्याचा प्रयत्न केला आहे. आजच्या युगात वैद्यकीय शास्त्राने कितीही प्रगती केली असली तरी काही प्रश्न हे न सुटणारे आहेत.

त्यामुळे आहेत ती परिस्थिती आनंदाने स्वीकारून पुढे जाण्याचा आशावादी संदेश हे नाटक प्रेक्षकांना देते.

डॉ. हेमंत कुलकर्णी, अम्मार मोकाशी, अमोल ठाकूर, दीप्ती बारी, नेहा पवार, उदय पाठक, बलवंत गायकवाड, बापू महाले, मोहित पाटील यांनी नाटकात भूमिका साकारल्या. नेपथ्य दिशा ठाकूर, तर प्रकाशयोजना जयेश कुलकर्णी यांनी साकारली. आशिष राजपूत यांनी पार्श्वसंगीत दिले. रंगभूषा योगेश शुक्ल तर वेशभूषा रसिका कुलकर्णी यांनी साकारल्या.

An episode from Parashuram Saikhedkar theater play 'Hum Do No'
Nashik News : बेवारस वाहनांचा लागणार शोध! पुण्याच्या गंगामाता वाहन शोध संस्थेचे सहकार्य

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.