Success Story : शेतकरी कन्येची महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! बागलाण तालुक्यातील पहिली मुलगी...

Kamini with parents.
Kamini with parents. esakal
Updated on

Success Story : येथील कामिनी एकनाथ बिरारी हिची महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड झाली असून, तिने नुकतेच दौंड जिल्हा पुणे येथे प्रशिक्षण पूर्ण केले आहे. महिलांमधून पात्र ठरलेली बागलाण तालुक्यातील ती पहिली मुलगी ठरली आहे. (Kamini Birari was selected in Maharashtra Security Force nashik success story news)

शेतकरी कुटुंबातील असलेल्या कामिनीने प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण आई-वडिलांना शेतीच्या कामात मदत करीत पूर्ण केले. पोलिस किंवा संरक्षण दलाच्या स्पर्धा परीक्षा देण्यासाठी पदवीचे शिक्षण घेत असताना तिने शारीरिक व बौद्धिक तयारी सुरू केली होती.

आई-वडिलांना स्पर्धा परीक्षाबद्दल अधिक माहिती नव्हती. परंतु त्यांनी कामिनीला स्वतःच्या करिअर निवडण्यासाठी पूर्ण स्वायत्तता दिली.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Kamini with parents.
Success Story : आई-वडिलांच्या कष्टाचे पांग फेडले! सख्खे भाऊ केंद्रीय राखीव पोलिस दलात...

विशेष म्हणजे तिने कुठल्याही प्रकारचे शिकवणीवर्ग व मार्गदर्शन नसताना आणि परिस्थिती नाजूक असली तरी अफाट जिद्द, काटेकोर नियोजन व दृढनिश्चय असला की यश हमखास मिळते या बळावर अल्पभूधारक शेतकरी कन्येने महाराष्ट्र सुरक्षा दलातील परीक्षा दिली व पहिल्याच प्रयत्नात तिने यश संपादन केले.

तिच्या यशाने गाव व परिसरातील मुलींना प्रेरणा मिळाली असून, मुली देखील देशाच्या संरक्षणात अग्रेसर आहेत, हे तिने दाखवून दिले. तिच्यावर सर्व क्षेत्रातून अभिनंदनाचा वर्षाव होत असून, गावकऱ्यांनी तिचे जंगी स्वागत केले.

Kamini with parents.
Startup Success Story: शिक्षण सोडले, 19व्या वर्षी 'किराणा स्टोअर' उघडून उभारली 7,300 कोटींची कंपनी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.