Nashik Crime News : कापडणीस पितापुत्र खूनप्रकरणात ॲड. निकम विशेष सरकारी वकिल

Adv. Ujjwal Nikam
Adv. Ujjwal Nikamesakal
Updated on

नाशिक : नाशिक शहर हादरून सोडणाऱ्या कापडणीस पिता-पुत्र खूनखटल्याची नियमित सुनावणी मे महिन्यापासून सुरू होणार आहे. यासंदर्भात बुधवारी (ता. ५) सरकार पक्षातर्फे विशेष सरकारी वकील म्हणून ॲड. उज्ज्वल निकम यांनी आपले वकीलपत्र जिल्हा न्यायालयास सादर केले. त्याचप्रमाणे संशयितांतर्फेही त्यांच्या वकिलांनी वकिलपत्र दाखल केले आहे. (Kapadnis father son murder case advocate ujjwal Nikam Special Public Prosecutor Nashik Crime News)

फेब्रुवारी २०२२ मध्ये मुक्त विद्यापीठाचे माजी कुलसचिव नानासाहेब कापडणीस व त्यांचा मुलगा डॉ. अमित यांच्या दुहेरी खूनप्रकरणाची उकल होऊन नाशिक शहर हादरले होते. संशयित राहुल जगताप याने कापडणीस यांची संपत्ती हडपण्यासाठी नियोजनबद्ध कट रचून बापलेकांची हत्त्या केली होती.

या प्रकरणात गृह विभागाने अॅड. निकम यांची सरकारी पक्षातर्फे नियुक्ती करावी, अशी शिफारस नाशिक पोलिस आयुक्तालयाने केली होती. त्यानुसार फेब्रुवारी २०२३ मध्ये विधी व न्याय विभागाच्या अधिसूचनेनंतर गृह विभागाने याबाबतचे आदेश निर्गमित केले.

हेही वाचा : जीएसटीसाठी नोंदणी केलीच नाही तर??

Adv. Ujjwal Nikam
Nashik News: बिलोंड्या, सातपायऱ्याच्या डोंगररांगांना आग; बागलाण तालुक्यातील 15 हेक्टर वनक्षेत्र खाक

बुधवारी (ता. ५) अॅड. उज्ज्वल निकम नाशिक जिल्हा व सत्र न्यायालयात हजर होत सरकार पक्षातर्फे वकीलपत्र दाखल केले. येत्या २१ एप्रिलला नियमित सुनावणीसाठीची तारीख दिली आहे. परंतु या खटल्याप्रकरणी युक्तिवाद मे महिन्यापासून सुरू होणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

सरकारवाडा पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक साजन सोनवणे यांनी याप्रकरणी सोळाशे पानांचे दोषारोपपत्र न्यायालयात सादर केले आहे. मुख्य संशयित राहुल जगतापसह संशयित प्रदीप शिरसाठ, विकास हेमके आणि सूरज मोरे यांच्याविरूद्ध सबळ पुरावे पोलिसांनी कसोशीने तपास करीत संकलित केलेले आहेत.

Adv. Ujjwal Nikam
Nashik News : मेंढपाळांना लागली गावाकडची ओढ! खरीप हंगाम संपल्यावर पुन्हा बाहेरगावी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.