पंचवटी (जि. नाशिक) : नंदी हा महादेवाचा वाहन समजला जातो. त्यामुळे प्रत्येक शिवमंदिरात नंदी हा महादेवाच्या समोर असतो. नाशिक येथील पंचवटीतील गोदाघाटलगत असलेल्या कपालेश्वर महादेव मंदिरात पिंडीसमोर नंदीच नाही, असे हे आगळेवेगळे मंदिर आहे.
प्रभू रामचंद्रांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या नाशिक नगरीला मोठा इतिहास आहे. नाशिक शहर म्हटले, की, डोळ्यांसमोर उभे राहातो तो म्हणजे दर बारा वर्षांनी भरणारा कुंभमेळा होय. पंचवटी परिसर हा गोदावरी नदीच्या डाव्या तीरावर आहे.
या गोदाघाटलगत अनेक देव-देवतांची मंदिरे आहेत. यात कपालेश्वर मंदिरात महादेवाच्या पिंडीसमोर नंदी नसलेले मंदिर आहे. या महादेवाच्या कपालेश्वर मंदिराची ही एक ऐतिहासिक महती होय. (kapaleeshwar temple only temple with Nandi in front of shivling Latest Marathi News)
आख्यायिका
असे म्हटले जाते, की महादेवांना ज्या वेळी ब्रह्महत्येचं पातक लागलं, त्या वेळी महादेवांनी या पातकापासून स्वतःची मुक्ती करून घेण्यासाठी त्रिभुवन पालथे घातलं. मात्र, त्यांचं पातक काही दूर होईनसे झाले होते.
आपण या पातकापासून कसं सुटणार, याची चिंता महादेवांना सतावत असतानाच, नंदीनं त्यांना नाशिकच्या रामकुंडावर आणलं. या ठिकाणी असलेल्या गोदावरी आणि अरुणा संगमात स्नान केल्यानंतर महादेवांचं पातक दूर झालं आणि ते ब्रह्महत्येच्या दोषातून मुक्त झाले.
आपल्याला या पातकापासून नंदीनं मुक्ती दिली, यामुळेच या ठिकाणी महादेवांनी नंदीला आपला गुरू मानलं, अशी आख्यायिका आहे.
बारा ज्योतिर्लिंगाच्या दर्शनाचे पुण्य
एका कपालेश्वर महादेवाच्या दर्शनात बारा ज्योतिर्लिंगाच्या दर्शनाचे पुण्य असल्याचा पौराणिक संदर्भ सापडतो. नाशिकच्या या कपालेश्वर महादेव मंदिरात श्रावणातल्या सोमवारी, तसेच शनिवार आणि प्रदोषाच्या दिवशी महादेवाची पालखी काढली जाते.
महादेवाच्या या कपालिक पिंडीच दर्शन घेतल्यास सर्व पातकांचा नाश होतो, अशी धारणा आहे. तसेच येथील कुंडात प्रभू श्रीराम रामचंद्रांनी दशरथाचे श्राद्ध केले होते, अशी श्रद्धा आहे.
श्रावणी सोमवार, महाशिवरात्री व इतर दिवशीदेखील मंदिरात भाविकांची गर्दी असते. महाशिवरात्रीनिमित्त मंदिराच्या गाभाऱ्यात शिव उपासक दूध, दही, मध, फळांचे रस याने महादेवाच्या पिंडीवर अभिषेक करतात.
कपालेश्वर मंदिराच्या समोर आणि गोदावरी नदीच्या पलीकडे प्राचीन सुंदरनारायण मंदिरही आहे. हरिहर भेटमहोत्सवाच्या वेळी कपालेश्वर आणि सुंदरनारायण मंदिरांमधून अनुक्रमे शंकर आणि विष्णू यांचे मुखवटे गोदावरी नदीवर आणले जातात आणि त्यांची भेट घडविली जाते.
"आमच्या निवासस्थानात उमा तीर्थ आहे. सदरहू उमा तीर्थ जिवंत जलस्रोत असून पाण्याचा अक्षय झरा आहे. त्याचे पाणी कदापि आटत नाही. श्री कपालेश्वर महादेवाचा पिंडीवर उमा तीर्थचा पाण्याचा जलाभिषेक जानी कुटुंबीयांमार्फत पिढ्यानपिढ्या सुरू आहे. १९७२ चा दुष्काळात पंचवटीकरांना सदर पाणी पिण्यासाठी उपलब्ध करून दिले होते. त्याव्यतिरिक्त पाण्याच्या इतर वापर आम्ही करत नाही. " - देवांग जानी, श्री कपालेश्वर सेवेकरी
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.