Nashik : एकसष्टीच्या रथावर नव्वदीची स्वारी; ‘कारभारीं’ची सायकल जगात भारी!

karbhari karhade with his cycle 'Lakshmi'.
karbhari karhade with his cycle 'Lakshmi'.esakal
Updated on

नाशिक : साधनांची उपलब्धता गतिमान मानवी जीवनाचा आरंभ बिंदू ठरला. विसाव्या शतकाच्या मध्यान्होत्तर साधननिर्मिती व तंत्रज्ञान क्षेत्रातील अनेकविध मूलगामी बदलांनी कष्टप्रद मानवी जीवनाचा पोतच बदलवून टाकला. वाढत्या साधनशुचितेमुळे व्यावहारिक वास्तवाकडे पाहण्याची मानवी परिदृष्टीच आमूलाग्र बदलली. साधनांमुळे जग तर जवळ आलं; परंतु माणसं दुरावली.

दैनंदिन व्यवहारात मानवी जीवन सुसह्य करणाऱ्या साधनांच्या अवास्तव समावेशाचे दुष्परिणाम एव्हाना दृगोच्चर (सर्वश्रृत) झालेले असताना पिंपळगाव बसवंत येथील ज्येष्ठ नागरिक कारभारी म्हसू कुऱ्हाडे यांनी आपल्या ६१ वर्षांच्या सायकल सारथ्यात काळ, काम आणि वेगाचे नवे आश्‍वासक मापदंड उभारत तरुण पिढीसमोर आदर्श निर्माण केला आहे. त्यांची हीच पथदर्शी जीवनपद्धत आजच्या तरुणाईला लाजवेल, अशीच आहे. (karbhari karhade from pimplegaon baswant using cycle for 61 years of journey of 2 million kilometers so far Nashik News)

karbhari karhade with his cycle 'Lakshmi'.
YIN Art Festival : ‘Hiphop- Bollywood’चा झटका अन्‌ लावणीचा तडका!

तो काळ तसा हलाखीचा... पोटाची खळगी भरण्यासाठी स्थलांतर पाचवीलाच पुजलेले... अशा परिस्थितीत मूळ निफाड तालुक्यातील कारसूळचे (ह. मु. पिंपळगाव बसवंत) कारभारी म्हसू कुऱ्हाडे (वय ८८) यांनी सुरतचा रस्ता धरला. पाइपलाइनचे खोदकाम करण्याचा पूर्वापार व्यवसाय करीत कारभारी कुऱ्हाडे आपल्या कुटुंबाचा गाडा हाकत होते.

साधनांची कमतरता असल्याने सुरतच्या मार्केटमधून १०५ रुपयांना ॲटलस कंपनीची सायकल त्यांनी खरेदी केली. काही दिवसांनंतर कारभारींनी आपल्या गावचा रस्ता धरला. याच सायकलवर (तिचे नाव लक्ष्मी आहे) दोन दिवस प्रवास करून कारभारींनी पिंपळगाव गाठले. त्यानंतरही ‘लक्ष्मी’च्या मदतीने कारभारी यांनी खोदकाम सुरूच ठेवले. कारभारी यांचा जन्म १ मार्च १९३५ चा. तरुणाईत असेपासून आतापर्यंत त्यांनी परिसरात पाइपलाइन खोदकाम केले. वयोमानानुसार खोदकाम होत नसल्याने ते आता कांदाचाळीवर राखणदार म्हणून काम करतात.

karbhari karhade with his cycle 'Lakshmi'.
YIN Art Festival : कागदांच्या चिरोट्यातून रेखीव Collage Work

असे असले तरी दररोज दहा ते बारा किलोमीटर प्रवास ठरलेलाच असल्याचे त्यांनी सांगितले. आतापर्यंत ‘लक्ष्मी’ वर त्यांनी दोन लाख २२ हजार किलोमीटरचा प्रवास केला आहे. कुठलेही व्यसन नसल्यानेच आपण आज तंदुरुस्त आहोत, हे ते अभिमानाने सांगतात. प्रामाणिक कष्ट आणि बेईमानीला थारा न दिल्यानेच इथपर्यंतचा प्रवास सुखकर झाला आहे. तरुणाईने आरोग्य जपण्यासाठी सायकलचा वापर करावा, असा संदेश कारभारी यांनी दिला आहे.

ना पेट्रोलचे टेन्शन ना मेंटेनन्सचे!

आजच्या धकाधकीच्या जीवनात पेट्रोल व महागाई भरमसाट वाढली आहे. मोटारसायकल असो की मोटारगाडी, त्यांच्या किमती गगनाला भिडल्या आहेत. आज मोटारसायकल घेण्यासाठी एक लाखाच्या वर पैसे मोजावे लागतात. पेट्रोलचे दर शंभरीच्या पुढे. या सर्व गोष्टींना कारभारी कुऱ्हाडे अपवाद आहेत. त्यांना ना पेट्रोल दरवाढीचे टेन्शन ना ऑइल-पाण्याचे.

"आमचा वडिलोपार्जित सायकल रिपेअरिंगचा व्यवसाय आहे. तेव्हापासून कारभारी कुऱ्हाडे यांच्या सायकलचे पंक्चर आम्हीच काढतो. ६१ वर्षांची सायकल आतापर्यंत कुठेही बघितली नाही." -राजेंद्र तोडकर, गॅरेज व्यावसायिक, पिंपळगाव बसवंत

karbhari karhade with his cycle 'Lakshmi'.
YIN Art Festival : कागदांच्या चिरोट्यातून रेखीव Collage Work

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.