Karda Construction Fraud Case: बांधकाम व्यावसायिक नरेश कारडा यांना जामीन

Naresh Karda
Naresh Kardaesakal
Updated on

Karda Construction Fraud Case : बांधकाम व्यावसायिक नरेश कारडा यांना जिल्हा व सत्र न्यायालयाने सशर्त जामीन मंजूर केला आहे.

त्यांना न्यायालयाने दर रविवारी पोलिस ठाण्यात हजेरी लावण्याचे आदेश दिले. (Karda Construction Fraud Case Builder Naresh Karda granted bail nashik crime news)

नाशिकमधील व्यावसायिकाने दिलेल्या फिर्यादीवरून कारडा यांच्याविरोधात मुंबई नाका पोलिसांत गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्यात ३० ऑक्टोबरला संशयित कारडा यांना आर्थिक गुन्हेशाखेच्या पथकाने अटक केली होती.

त्यानंतर उपनगर पोलिसांत ५ नोव्हेंबरला जळगावातील व्यावसायिकाने कारडा यांच्याविरोधात चार कोटी रुपयांच्या अपहाराची फिर्याद दिली होती.

Naresh Karda
Nashik Fraud Crime: मालेगावच्या कर सल्लागाराला बनावट पावत्याप्रकरणी अटक; 86 कोटींचे बनावट इनव्हॉइस

बुधवारी (ता. ८) कारडा यांना जिल्हा व सत्र न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली. कारडा मध्यवर्ती कारागृहात असताना त्यांच्यावर गुरुवारी (ता. ९) तिसरा गुन्हा उपनगर पोलिसांत दाखल झाला.

त्यामध्ये नाशिक रोड परिसरातील महिलेने फिर्याद दिली आहे. शुक्रवारी (ता.१०) खासगी वकील राहुल कासलीवाल यांनी कारडा यांचा जामीन अर्ज न्यायालयात सादर केला. त्यानुसार न्यायालयाने अटी-शर्तींनुसार जामीन मंजूर केला.

Naresh Karda
Nashik Naresh Karda: बिल्डर नरेश कारडा यांच्या अडचणीत वाढ; 4 कोटींच्या फसवणुकीचा दुसरा गुन्हा दाखल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.