खामखेडा (जि. नाशिक) : दीडशे ते दोनशे वर्षाची परंपरा असलेल्या येथील काठेकावड उत्साहास थाटात सुरवात झाली आहे. कोरोनामुळे दोन वर्ष या परंपरेला खंड पडला होता.
मात्र यावर्षी चैत्राच्या महिनाभर चालणाऱ्या उत्सवास नुकताच प्रारंभ झाला आहे. (Kathekawad begins with excitement After 2 year break villagers prepare for victory Nashik News)
मराठी नववर्ष गुढीपाडव्यापासून काठेकावड उत्सवास सुरवात होते. संपूर्ण चैत्र महिन्यातील प्रत्येक सोमवारी रात्री गावातून महादेवाची काठेकावड मिरवली जाते. चंदनाच्या लाकडापासून ही काठेकावड तयार केली जाते. कावडच्या मुखांवर नंदी व महादेवाची चित्र कोरलेली असतात.
गुढीपाडव्याच्या दिवशी महादेवाच्या कावडची आंघोळ घालून नवीन कापडाचे ध्वज चढविले जाऊन विधिवत पूजा केली जाते. त्यावेळी प्रत्येक घरासमोर ही काठेकावड पूजेसाठी उभी केली जाते.
कावडवर पाणी टाकून काठीवरील नंदीची घरातील महिलांकडून अंघोळ घातली जाते. रोशन, लालकाठी, डफ यांची ही प्रत्येक सुवासांनी व कुटुंब प्रमुखांकडून पूजा घातल्यानंतर विष्णू पंचायत मंदिराजवळ एकत्र जमत महादेवाचे वन म्हणून काठेकावड नाचवली जाते.
हेही वाचा : जीएसटीसाठी नोंदणी केलीच नाही तर??
खामखेडा येथे काठेकावड हा उत्सव अनेक पिढीपासून चालत आला आहे. यावेळी डफ हे वाद्य वाजून महादेवाच्या ओव्या म्हटल्या जातात. तर गावात ठिकठिकाणी चौकात महादेवाची तालासुरात कवन म्हटली जातात.
खामखेडा येथील कै. धोंडू सुतार, कै. विठ्ठल मोरे यांच्या कुटुंबाकडे काठी कावड परंपरागत असून उत्सवाची ही प्रथा परंपरेनुसार जोपासली जात आहेत. कै. आनंदा शेवाळे यांच्या कुटुंबीयांकडे लाल काठी व निंबा शेवाळे, छोटू शेवाळे व रामदास निंबा शेवाळे यांच्या कुटुंबीयांकडे रोशन व कै. दगडू बच्छाव यांच्या कुटुंबांकडे डफ हे या उत्सवातील वाण आहेत.
"अनेक वर्षापासून सुरु असलेली परंपरा पुढच्या पिढीला देखील कळावी व संस्कृतीचे संवर्धन व्हावे या उद्देशाने उत्साहात साजरा केला जातो."- दादा बोरसे, काठीकावड संवर्धक,ग्रामस्थ
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.