Wood Apple : उष्णतेच्या विकारांपासून दूर ठेवणारे बहुगुणी कवठ; आयुर्वेदात महत्त्व अधोरेखित

On the occasion of Mahashivratri, there is a good demand for koutas, so vendors from different parts of the district come in large numbers to sell
On the occasion of Mahashivratri, there is a good demand for koutas, so vendors from different parts of the district come in large numbers to sellesakal
Updated on

नाशिक : महाशिवरात्रीच्या पार्श्‍वभूमीवर गंगाघाटावर दरवर्षीप्रमाणे यंदाही ग्रामीण भागातून मोठ्या प्रमाणावर कवठ विक्रेते दाखल झाले आहेत. माणसाला कवठ उष्णतेच्या विकारापासून दूर ठेवत असल्याने आयुर्वेदातही त्याचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले आहे. (Kavath protects against heat disorders importance in Ayurveda booming in market nashik news)

दरवर्षी महाशिवरात्रीच्या चार- पाच दिवस आधी ग्रामीण भागातून कवठ विक्रेते मोठ्या संख्येने शहरात दाखल होतात. पूर्वी रामतीर्थाजवळ हे विक्रेते विक्री करत. सध्या त्या ठिकाणी जागा नसल्याने गाडगे महाराज पुलाच्या वरील बाजूस म्हणजे म्हसोबा पटांगणावर हे विक्रेते दाखल झाले आहेत.

या ठिकाणी होलसेल दरांत साधारण पाचशे ते सहाशे रूपयांत गोणीभर कवठे मिळतात. एका गोणीत साधारण शंभर ते दीडशे कवठ असतात.

हे विक्रेते निफाड, चांदवड, बागलाण तालुक्यातून शहरात येतात. चांदवड तालुक्यातील धोंडगव्हाणवाडी, वडनेर भैरव, निफाड तालुक्यातील पिंपळगाव बसवंत, जोपुळ, लोखंडेवाडी, पाचोरे वणीसह बागलाण तालुक्यातून शहरात कवठाची मोठ्या प्रमाणावर आवक होते.

या भागात अद्यापही मोठ्या प्रमाणावर कवठाची झाडे आहेत. संबंधित कवठ विक्रेते या झाडांचा स्थानिक शेतकऱ्यांकडून लिलाव घेतात. एका झाडातून किमान हजार ते दोन हजारांपर्यंत कवठ उपलब्ध होत असल्याचे घाऊक विक्रेत्यांनी सांगितले.

कधीकाळी हा धंदा फायद्याचा होता, परंतु आता कवठ उतरविण्यासह वाहतुकीसाठी येणाऱ्या खर्चात मोठी वाढ झाल्याचे जेमतेम नफा होत असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले.

On the occasion of Mahashivratri, there is a good demand for koutas, so vendors from different parts of the district come in large numbers to sell
JEE Mains Exam : जेईई मेन्‍स परीक्षा अर्जाची 12 मार्चपर्यंत मुदत

आयुर्वेदात महत्त्व

धर्मशास्त्र आणि आयुर्वेद हातात हात घालून चालते, असे म्हटले जाते. हिंदू धर्मियांत विविध उत्सवात देण्यात येणाऱ्या प्रासादातूनही हेच सिद्ध होते. प्रासादातून माणसाला नकळत सकारात्मक ऊर्जा मिळत असल्याचे आजवरच्या संशोधनातूनही स्पष्ट झाले आहे.

कवठ खाल्याने उन्हातून चालत आल्यावर आलेला थकवा क्षणात दूर होतो, असे आयुर्वेद तज्ज्ञ सांगतात. उन्हाळ्यात वातावरणातील उष्णतेमुळे गोवर, कांजिण्या होण्याचे प्रमाण अधिक असते. या काळात कवठ खाणे खऱ्या अर्थाने आरोग्यदायी आहे.

कवठाच्या सेवनाने रक्तदाबही कमी होत असल्याचे सिद्ध झाले आहे. महाशिवरात्रीसाठी कवठाला विशेष महत्त्व असून त्यांची शहराच्या विविध भागात विक्री सुरू झाली आहे.

होलसेल दरात पाच ते सात रूपयांत मिळणारे कवठ किरकोळ बाजारात दहा ते वीस रूपयांत उपलब्ध आहे. तर काही ठिकाणी एका कवठासाठी तीस रुपये मोजावे लागत आहेत.

हेही वाचा : हिंडेनबर्ग अहवालाचा फटका भाजपला भविष्यात बसणार?

On the occasion of Mahashivratri, there is a good demand for koutas, so vendors from different parts of the district come in large numbers to sell
NMC Recruitment : भरतीची तांत्रिक बाबी पूर्ण करताना दमछाक; सुशिक्षित बेरोजगारांना वर्षभर वाट पाहावी लागणार

कपित्थ (कैथ)

कपित्थस्तु दधित्थ: स्यात्तथा पुष्पफल स्मृत कपिप्रियोदधिफलस्तथा दन्तशठोपिच।।

कपित्थमामं संग्राहि कषायं लघु लेखनम।

पक्वं गुरू तृषाहिक्काशमनं वातपित्तजित। स्वाद्वम्लं तुवरं कण्ठशोधनं ग्राहि दुर्जरम।।

"कवठापासून प्रोटिन्ससह मोठ्या प्रमाणावर व्हिटॅमिन्स मिळतात. उष्णतेच्या विविध विकारांवर कवठ व कोकम एकत्र घेतल्यास अधिक आरोग्यदायी आहे."- वैद्य विक्रांत जाधव, नाशिक

"गत तीस वर्षांपासून हा व्यवसाय सहकुटुंब करते. त्याद्वारे मजुरीपेक्षा दोन पैसे अधिक मिळतात. त्यामुळे महागाईतही कुटुंबातील गाडा हाकणे सोपे जाते."

- लताबाई कडाळे, धोंडगव्हाणवाडी.

"पूर्वीच्या तुलनेत कवठाच्या झाडाच्या लिलावासह अन्य मजुरीत मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे परवडत नसूनही या व्यवसायात माझी दुसरी पिढी कार्यरत आहे."

- देवीदास पवार, वटार (ता. बागला

On the occasion of Mahashivratri, there is a good demand for koutas, so vendors from different parts of the district come in large numbers to sell
Water Crisis : अमरावती धरणात फक्त 30 टक्के जलसाठा शिल्लक!

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.