काझीगढी रहिवाशांचा मनपा कर्मचाऱ्यांवर रोष; भिंतीचा भाग कोसळला

Municipal employees barricading the main road at the base of kazi gadhi
Municipal employees barricading the main road at the base of kazi gadhiesakal
Updated on

जुने नाशिक : गेल्या चार दिवसांपासून संततधारेमुळे (Constant rain) काझीगढीची (Kazi Gadhi) माती मोठ्या प्रमाणावर धुतली गेली. शनिवारी (ता. १६) रात्री दहाच्या सुमारास गढीची माती ढासळून तुटक्या बंद घराच्या भिंतीचा भाग कोसळला.

यावेळी रहिवाशांनी महापालिका कर्मचाऱ्यांवर (NMC Employees) आगपाखड करत रोष व्यक्त केला. (Kazigadhi Residents quarrel Against NMC Employees Part of wall of kazigadhi collapsed nashik latest marathi news)

काझीगढीचा बहुतांशी भाग धोकादायक झाला आहे. दरवर्षी पावसाळ्यात येथील घरांचा भाग कोसळण्याच्या घटना घडत असतात. काही रहिवाशांनी तेथून कायमस्वरूपी स्थलांतर केले आहे.

ज्यांची आर्थिक परिस्थिती चांगली नाही, असे रहिवासी मात्र अद्यापही त्याठिकाणी जीव मुठीत घेऊन वास्तव्यास आहेत. गढीची माती पावसाळ्यात धुतली जात असल्याने तो भाग धोकादायक झाला आहे.

शनिवारी सायंकाळी झालेल्या पावसाने रात्री दहाच्या सुमारास गढीच्या काठावरील माती ढासळली. त्यामुळे त्याठिकाणी असलेल्या बंद घराच्या तुटलेल्या भिंतीचा काही भाग खाली कोसळला.

पश्चिम विभागाच्या कर्मचाऱ्यांना माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी दाखल होत पाहणी केली. कोसळल्या भागास लागून असलेल्या रहिवाशांना सुरक्षितस्थळी स्थलांतर करण्याचे सांगितले. रहिवाशांनी मात्र कर्मचाऱ्यांवर रोष व्यक्त केला.

Municipal employees barricading the main road at the base of kazi gadhi
विद्यार्थ्यांनी दिली 'NEET' परीक्षा; 5 टक्के विद्यार्थी गैरहजर

दरवर्षी पावसाळ्यात येतात आणि आश्वासन देऊन निघून जातात. येथून जाणार तरी कुठे? घर घेण्याची आर्थिक परिस्थिती नाही. संरक्षण भिंत बांधून होणाऱ्या दुर्घटना टळू शकतात. आता तर जे नशिबी आहे ते होईल.

खऱ्या लाभार्थींना कुणालाही अद्याप घर देण्यात आलेली नाहीत. घर देण्यात आली असती, तर आम्ही केव्हाच स्थलांतरित झालो असतो, असे रहिवाशांनी कर्मचाऱ्यांना सुनावले. दरम्यान, मध्यरात्री माती ढासळण्याची शक्यता असल्याने कर्मचाऱ्यांनी गढीच्या पायथ्याशी नदीपात्रास लागून असलेला रस्ता बॅरिकेटिंग करून वाहतुकीसाठी बंद केला.

नगरविभागाचे जोपळे आणि बांधकाम विभागाचे अरुण मोरे यांनी दोन्ही ध्वनिक्षेपणाच्या माध्यमातून परिसरातील नागरिकांना सावधानतेचा इशारा दिला. शिवाय गढीवरील आणि पायथ्याशी वास्तव्यास असलेल्या रहिवाशांना सुरक्षितस्थळी स्थलांतर होण्याच्या सूचना केल्या.

Municipal employees barricading the main road at the base of kazi gadhi
नाशिक : पावसामुळे वाहने नादुरुस्त; गॅरेज व्यवसाय तेजीत

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()