नाशिक : येथील केन्सिंगटन क्लबमधील हौशी बॅडमिंटनपटूंच्या पुढाकाराने व नाशिक जिल्हा बॅडमिंटन असोसिएशनच्या सहकार्याने सुरू असलेल्या केन्सिंगटन चॅम्पियन्स लीग स्पर्धांच्या खेळाडूंचा लिलाव ऑनलाईन पद्धतीने करण्यात आला. (Kensington Champions League Players Auction Nashik News)
‘स्वच्छ नाशिक, सुंदर नाशिक व तंदुरुस्त नाशिक’ हा संदेश घेऊन नाशिकमध्ये प्रथमच अशा पद्धतीने लिलाव करून बॅडमिंटन लीग स्पर्धा होत आहे. शहरातील १९ ते ७५ वर्षे वयोगटातील स्री- पुरुष खेळाडूंच्या या स्पर्धेसाठी क्लबने इच्छुकांकडून माहिती मागवली होती. त्यास तब्बल २२० खेळाडूंनी प्रतिसाद दिला.
त्यात, आदित्य कासार यांचा आदित्य शटलर, महेंद्र नेटवटे व संतोष जाधव यांचा एमएसजे वॉरियर्स, डॉ. प्रीतम जपे व रवींद्र आढाव यांचा नाशिक सुपर जायंटस्, ऋषभ गोलिया व मनीष अहिरे यांचा रिष पॉवर शटलर, आशिष तोरणे यांचा रॉयल मराठा व रत्नाकर आहेर यांचा एस. पी. शटलर अशा सहा संघ मालकांनी लिलावात बोली लावत उत्कृष्ट खेळाडूंची निवड केली.
हेही वाचा : जीएसटीसाठी नोंदणी केलीच नाही तर??
या लीगमुळे स्थानिक खेळाडूंना अनुभवी प्रशिक्षकांसोबत खेळण्याचा व त्यांच्या मार्गदर्शनाचा लाभ होणार असल्याचे कॅन्सिंगटन क्लबचे विक्रांत मते यांनी सांगितले. या वेळी नाशिक बॅडमिंटन असोसिएशनचे अध्यक्ष राधेश्याम मुंदडा, उपाध्यक्ष योगेश एकबोटे, सचिव दिलीप लोंढे, प्रशिक्षक अमित देशपांडे, पराग एकंडे, विक्रांत करंजकर, सिद्धार्थ वाघ, अभिषेक पाटील,
चंदन जाधव, दिनेश अडसरे, अनुप घटे, रवी पवार, मंजीतसिंग धुप्पर, विक्रम उगले, मुकेश पवार, कपिल नारंग, उदय कोठावदे, विक्रांत खुणे, मेहुल पोपट, शैलेंद्र अवस्थी, कौस्तुभ पवार, रवींद्र शिंदे, भूषण कुटे, मोहन शिंदे, सचिन गायकवाड, मदन जोशी, निलेश ठाकरे उपस्थित होते.
"या स्पर्धेतून खेळाडूंना पहिल्यांदा पैसे देण्यात येणार आहेत. १९ ते ६० वर्षांपर्यंतच्या एकुण २२० खेळाडूंनी स्पर्धेसाठी नाव नोंदविले होते. त्यापैकी १०८ खेळाडू स्पर्धेत खेळतील. विजेत्या संघाला एक लाख रुपये व उपविजेता संघाला ५० हजार रुपये रोख पारितोषिक दिले जाईल. या स्पर्धेत अनेक जिल्हास्तरीय, राज्यस्तरीय व राष्ट्रीय स्तरावरील खेळाडूंनी सहभाग घेतलेला आहे."
- पराग एकंडे, सचिव, नाशिक जिल्हा बॅडमिंटन संघटना.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.