Nashik News: भ्रष्टाचार निपटून काढणे ही ‘मोदी की गॅरंटी’ : केशव उपाध्ये

Bharatiya Janata Party chief spokesperson Keshav Upadhyay speaking at the press conference.
Bharatiya Janata Party chief spokesperson Keshav Upadhyay speaking at the press conference.
Updated on

Nashik News: जिथे काँग्रेस तिथे भ्रष्टाचार, त्यामुळे भ्रष्टाचार ही काँग्रेसची गॅरंटी हे समीकरण झालं आहे; तर भ्रष्टाचार निपटून काढणे ही ‘मोदी की गॅरंटी’ आहे, असा घणाघात भारतीय जनता पक्षाचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी केला.

शनिवारी (ता. ९) शहरातील भाजप कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. या वेळी आमदार सीमा हिरे, शहराध्यक्ष प्रशांत जाधव, लक्ष्मण सावजी आदींची उपस्थिती होती. (Keshav Upadhyay statement Eliminating corruption is Modi guarantee nashik news)

श्री. उपाध्ये म्हणाले, की झारखंडमधील काँग्रेसचे खासदार धीरज साहू यांच्या घरात सुमारे २०० कोटींहून अधिक रोकड जप्त करण्यात आली. यावरून काँग्रेसच्या अन्य नेत्यांच्या घरी आणि गांधी परिवाराकडे किती संपत्ती असेल, याचा हिशेब जनतेने करावा. काँग्रेसचे नेते, कार्यकर्त्यांना जेथे भ्रष्टाचाराचे प्रशिक्षण मिळते, ते केंद्रस्थान आता देशाला माहीत झाले आहेच; तर त्याचे नाव ‘गांधी करप्शन सेंटर’ असे ठेवावे, असा उपरोधिक टोला त्यांनी लगावला.

साहूंच्या काळ्या कमाईचा नेमका किती हिस्सा गांधी परिवाराकडे जात असेल, यासह काँग्रेसने देशात असे किती साहू पोसले असतील, असा सवाल त्यांनी केला. काँग्रेसी नेते भ्रष्टाचाराचे भांडे फुटले की तपास यंत्रणांच्या नावाने आगपाखड करतात. मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्यासमोर ही घटना उघडकीस आल्याने त्यांनी सत्तेवर राहू नये.

बंगळूरमध्ये काँग्रेसच्या एका निकटवर्तीच्याच घरी ४२ कोटींचे, तर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या सरकारमधील पार्थ चटर्जी यांच्या घरात ५० कोटींची रोकड व कोट्यवधींचे सोने सापडले होते. अरविंद केजरीवाल यांचे साथीदार सत्येंद्र जैन यांच्याकडेही सोन्याची नाणी व कोट्यवधींची रोकड जप्त करण्यात आल्यावर केजरीवाल यांनी मौन धारण करून भ्रष्टाचार लपविण्याची धडपड चालविली आहे, असे ते म्हणाले.

Bharatiya Janata Party chief spokesperson Keshav Upadhyay speaking at the press conference.
Sharad Pawar: शरद पवारांच्या नेतृत्वाखाली सोमवारी कांदाप्रश्नी चांदवडला आंदोलन

काँग्रेस आणि हेमंत सोरेन यांच्या गठबंधन सरकारने ‘मनरेगा’मध्ये ५५० कोटी, कोळसा खाणींच्या व्यवहारात दीड हजार कोटी, अवैध खाण उत्खननातून दीड हजार कोटी, ग्रामीण विकास निधीतून दीड हजार कोटी, जमीन घोटाळ्यातून तीन हजार कोटींच्या जनतेच्या पैशांवर डल्ला मारला आहे, असा आरोप त्यांनी केला.

त्यांनी शिवसेनेची वाट लावली

ज्या नेत्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप, त्यांना युतीत स्थान असा प्रश्न केला असता उपाध्ये म्हणाले, की ज्यांच्यावर आरोप आहेत, त्यांच्यावरील कारवाई थांबलेली नाही. प्रताप सरनाईक यांना महाविकास आघाडी सरकारने ‘क्लीन चीट’ दिली होती. त्यांच्यावरही कारवाई सुरू आहे. ही बाब न्यायप्रविष्ट आहे.

संजय राऊत यांनी सरकारवर केलेल्या टिकेला उत्तर देताना उपाध्ये म्हणाले, की राऊत यांनी नैतिकतेचा उल्लेख करू नये. पत्राचाळमध्ये अनेक मराठी लोकांचेही नुकसान झाले. टिपू सुलतानचे कौतुक करणाऱ्यांनी शिवसेनेची वाट लावली, या शब्दांत त्यांनी राऊत यांना सुनावले.

Bharatiya Janata Party chief spokesperson Keshav Upadhyay speaking at the press conference.
Nashik News: बागलाणसाठी 311 कोटींचा निधी मंजूर : दिलीप बोरसे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.