Nashik News: मालेगावात 10 नोव्हेंबरपर्यंत खादी महोत्सव! तहसीलदार नितीन देवरे

While inaugurating the Khadi festival, Tehsildar Nitin Kumar Deore along with Dr. Apaschim Baranth, Sanjay Joshi, Dr. Yashwant Deore etc
While inaugurating the Khadi festival, Tehsildar Nitin Kumar Deore along with Dr. Apaschim Baranth, Sanjay Joshi, Dr. Yashwant Deore etcesakal
Updated on

मालेगाव : येथे रक्तमोक्षण शिबिराच्या निमित्ताने दरवर्षी लाईफस्टाईलला उपयोगी अशा खादीच्या उत्सवाचे आयोजन ग्रामस्वराज्य समितीमार्फत केले जाते.

यंदाच्या उत्सवाला आजपासून सुरवात झाली असून येत्या १० नोव्हेंबरपर्यंत हा उत्सव सुरू राहील. खादी एक जीवनशैली होण्यासाठी सर्वांनी या प्रक्रियेत योगदान द्यावे असे आवाहन उत्सवाच्या उद्‌घाटनप्रसंगी तहसीलदार नितीन देवरे यांनी केले. (Khadi Festival in Malegaon till November 10 Tehsildar Nitin Deore Nashik News)

श्री. देवरे यांनी उपस्थितीतांशी संवाद साधला. आपण स्वतः विनोबांच्या साहित्याचे वाचक आहोत, त्यांच्या निवडक गुणांची जरी आपण अंमलबजावणी केली तरी जगणे सुलभ होईल. त्यांनी दाखविलेल्या मार्गावर वाटचाल करणे हीच त्यांना खरी आदरांजली आहे. खादी वापरण्यास प्रत्येकाने प्राधान्य दिले पाहिजे.

महात्मा गांधी व विनोबा भावे यांच्या प्रतिमेस सुताची माळ घालून उत्सवास सुरवात करण्यात आली. संजय जोशी यांनी आपल्या खादी उत्सव आणि बाजारपेठेमध्ये येणारी खादी नावाने विकल्या जाणाऱ्या कपड्यांच्या सेल मधील फरक समजावून सांगितला.

ते म्हणाले, या खादी प्रक्रियेत शेवटच्या माणसापर्यंत रोजगार मिळतो आणि कुठलेही पर्यावरणाचे नुकसान न होऊ देता कमीत कमी साधनांचा उपयोग करून आपली खादी बनवली जाते.

While inaugurating the Khadi festival, Tehsildar Nitin Kumar Deore along with Dr. Apaschim Baranth, Sanjay Joshi, Dr. Yashwant Deore etc
Nashik Water Crisis: जिल्हा टंचाई कृती आराखडा 10 कोटीने वाढणार!

मशिनचा वापर केल्याने रोजगार निर्मिती कमी होते आणि नफा निवडक लोकांकडे जातो, याचे भान आपण राखले पाहिजे असेही त्यांनी आवर्जून सांगितले. शहरातील लोकांसाठी ही एक संधी आहे, तरी सर्वसामान्यांनी त्याचा लाभ घ्यावा असे आवाहन समितीने केले.

याप्रसंगी डॉ. यशवंत देवरे, अतुल्य आयुर्वेदचे डॉ. शुभांगी बरंठ, डॉ. अपश्चिम बरंठ, ज्योती मोरे, भवर बरंठ, देविदास गायकवाड, रवी कण्णके, तुषार पाडाडे, सागर पिंपरिया, दादा इंगळे, बंटी भदाणे, भय्या सोनवणे आदी उपस्थित होते. डॉ. बरंठ यांनी आभार मानले.

खादी महोत्सवाविषयी...

खादीचे हे प्रदर्शन आयएमए हॉलसमोर, दीपक थिएटरमागे सकाळी ८ ते रात्री ९ वेळेत चालू राहील.

While inaugurating the Khadi festival, Tehsildar Nitin Kumar Deore along with Dr. Apaschim Baranth, Sanjay Joshi, Dr. Yashwant Deore etc
Nashik News: सरस्वती नदीपात्रालगत अतिक्रमणावर हातोडा! सिन्नरला महसूल विभागाची पोलिस बंदोबस्तात कारवाई

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.