खैराची तस्करी गुजरात सिमेवरील कुकूडणे जंगलात रोखण्यात यश

खैर लाकडाची तस्करी करणारे गुजरात राज्यातील वाहन जप्त
तस्करी
तस्करी sakal
Updated on

नाशिक सुरगाणा : सुरगाणा व पेठ तालुक्यातील जंगलातून तस्करांनी सागवान लाकूड संपविले आहे. आता दोन ते पाच वर्षापासून खैर लाकडांच्या तस्करीकडे आपला मोर्चा वळवला आहे.खैर लाकडाची तस्करी करणारे वाहन जप्त करण्यात वनविभागाच्या पथकास यश आले आहे. वनविभागाने केलेल्या कारवाईत एक गुजरात राज्याची पासिंग असलेले वाहन आणि अवैधरीत्या तोडलेले खैर लाकूड जप्त केले आहे. सातत्याने उंबरठाण, बा-हे वन परिक्षेतातून खैर लाकडाची तस्करी होत आहे. मागील आठवड्यात पिंपळसोंड पैकी उंबरपाडा तातापाणी जंगलातून खैर लाकूड हस्तगत करण्यात आले होते तसेच वनविभागाने बोरपाडा येथून लाकूड ताब्यात घेतले.

या भागातून होत असलेली खैर लाकडाची तस्करी रोखण्याचे मोठे आव्हान वनविभागापुढे समोर आहे. जंगलातून शेजारील गुजरात राज्यात मोठ्या प्रमाणात खैर लाकडाची तस्करी होत असते. उंबरठाण वनपरिक्षेत्रातील कुकूडणे वन परिमंडळांतर्गत असलेल्या वनक्षेत्रातून जीजे-१५ झेड-३९८१ या क्रमांकाच्या पिकअप गाडीतून तस्कर खैर लाकडे अवैधरीत्या वाहून नेणार असल्याची गोपनीय माहिती उंबरठाण वनपथकाला मिळाली होती. त्यानुसार सुरगाणा व उंबरठाण वनविभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी श्री. वेलकर, कैलास नागरगोजे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक वनसंरक्षक अधिकारी हेमंत शेवाळे, वनरक्षक रामजी कुवर, जेजीराम चौरे,गोविंद वाघ, अक्षय पाडवी, हरी चव्हाण, तुकाराम चौधरी, भटू बागुल, वनपाल किसन वाघेरा, गावित, के. एस. गायकवाड यांच्या पथकाने बुधवारी (ता.३१) रात्री आठ वाजेच्या सुमारास कुकूडणे जंगलाच्या परिसरातून जाणाऱ्या रस्त्यावर सापळा रचला. यावेळी तस्करी करणाऱ्या संशयित यांना वनविभागाच्या आल्याची कुणकूण लागताच खैर तस्करांनी पळून जाण्यासाठी पिक अप वाहन भरघाव वेगाने घेत असतांना वाहन पलटी झाले.

वनाधिकाऱ्यांनी देखील दुसऱ्या वाटेने गुजरातकडे जाणारी चोर वाट गाठली. कुकूडणे रस्त्यावरून जात असताना पथकाने वाहनाद्वारे त्या पिकअपचा पाठलाग करीत असता वाहन पलटी झाल्याचे दिसले.

यावेळी तस्करांनी वाहून जागेवरच सोडून देत अंधाराचा फायदा घेत पळ काढला. यावेळी वनविभागाच्या पथकाने खैराचे चोवीस नग लाकूड हस्तगत केले. त्याची अंदाजे किंमत पंधरा ते वीस हजार रुपये असल्याचे वनविभागाने सांगितले.पिकअप चालकासह अज्ञात तस्करांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या कामी वनविभागाला उंबरठाणचे सहाय्यक पोलीस सागर नांद्रे यांचे सहकार्य लाभले. पुढील तपास सुरु आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()