खामखेडा बनतेय कोबीचे आगर! गुजरातमधून मागणी, अर्थकारण बदलले

khamkheda
khamkhedaesakal
Updated on

खामखेडा (जि.नाशिक) : खामखेडा गावाने गेल्या वीस वर्षात कमी पाण्यात साठ दिवसाच्या खरीप हंगामातील कोबीच्या उत्पादनाला सुरुवात केली अन् पाहता पाहता गावाचे अर्थकारणच बदलून गेले. संपूर्ण जिल्हा आणि राज्यात गावाची ओळख आता कोबीचे आगर म्हणून झाली असून यामुळे गावातील काही शेतकऱ्यांनी पारंपरिक पिकांना फाटा देत वीस वर्षापूर्वी कोबीच्या उत्पादनास सुरुवात केली. कमी पाण्यात व केवळ दोन महिन्यात चांगले उत्पादन मिळाल्यामुळे गावकऱ्यांना या प्रयोगातून प्रगतीच्या वाटा दिसू लागल्या. आज गावातील बरेच शेतकरी वीस गुंठ्यापासून तीनचार एकर ते मोठे शेतकरी दहा एकरापर्यंत खरीप हंगामात कोबीची लागवड करतो. एकरी विस ते पंचवीस टन कोबीचे उत्पादन मिळते. मागीलवर्षी शेतकऱ्यांना चाळीस रुपये बाजार भाव मिळाल्याने चालूवर्षी गाव परिसरात दीड ते दोन हजार एकरावर कोबीची लागवड झाली आहे. (Khamkheda-becomes-cabbage-village-marathi-news-jpd93)

व्यापाऱ्यांचा खामखेड्यात तळ

गावातील कोबीच्या उत्पादनास अहमदाबाद, राजकोट, सुरत, बडोदा, नडियाद जामनगर या भागात मोठ्या प्रमाणावर मागणी असते. दरवर्षी या भागातील पाच ते सहा व्यापारी आडते खामखेड्यात महिन्याहूनही अधिक कालावधीपासून गावात तळ ठोकून असतात.

तरूणांना रोजगार

कोबी काढण्यासाठी मजुरांना मोठी मागणी असते. एका व्यापाऱ्याकडे गावातील पंचवीस ते तीस तरुणांची एक अशा टोळ्या असुन सर्व व्यापारींकडे मिळून दीड दोनशे तरुणांना कोबी काढणी, गोणीभराई, ट्रक लोडिंग अशी कामे मिळू लागली आहेत.

फवारणी रोग प्रतिबंधक

या पिकास सुरुवातीस अळीचे नियंत्रण महत्त्वाचे असते. बुरशीमुळे त्याचे प्रमाण वाढते. यानंतर या पिकावर करपा, घाण्या तसेच डावन्या हे रोग येऊ शकतात, मात्र योग्य नियंत्रण ठेवल्यास रोगरहित पीक शेतकरी काढू शकतात. अवघ्या पंचाव्वन ते साठ दिवसात हे पीक तयार होते, त्यामुळे गावातील सर्वच शेतकरी हे पीक घेऊ लागले आहेत.

khamkheda
'त्या' बहुचर्चित विवाहात बच्चू कडू साधे फिरकलेही नाही!

दीड ते दोन हजार एकरावर लागवड

गावात आजमितीस दीड ते दोन हजार एकर क्षेत्रावर या पिकाची लागवड झाली आहे. या प्रमाणेच सावकी, विठेवाडी, भऊर, बगडू, पिळकोस, विसापूर, भादवण या पंचक्रोशीतही या पिकास पसंती देऊ लागले आहेत. कोबीचे पीक खरीप हंगामात घेता येते, दोन महिन्यात हे पीक तयार होते. तसेच दोन एकरातील कोबी दहा एकरातील मक्याच्या उत्पादनापेक्षा अधिक उत्पन्न मिळवून देत असल्यामुळे शेतकरी कोबीला अधिकची पसंती देत आहेत.

khamkheda
नाशिक-मुंबई महामार्गावर प्रवास करताना टोल का भरावा?

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()