Shiv Mahapuran Katha: शिवमहापुराण कथेसाठी खान्देशवासिय नाशिक मुक्कामी!

pradip mishra
pradip mishraesakal
Updated on

मालेगाव : सिहोर येथील आंतरराष्ट्रीय कथावाचक पंडीत प्रदीप मिश्रा यांची शिवमहापुराण कथा नाशिक येथे २१ ते २५ नोव्हेंबर दरम्यान होत आहे. पाच दिवसीय कथेसाठी मालेगावसह खान्देशवासीय नाशिक मुक्कामी जाणार आहेत.

त्यादृष्टीने भाविकांची लगबग सुरु आहे. कथेबरोबरच ञ्यंबकेश्‍वर, सप्तशृंगगड आदी ठिकाणी देवदर्शन करता येणार आहे. काही भाविक कथास्थळी पाच दिवस मुक्कामी राहणार आहेत. (Khandesh residents stay in Nashik for Shiv Mahapuran katha nashik)

पंडीत प्रदीपजी मिश्रा यांची श्री शिवमहापुराण कथा गेल्यावर्षी मालेगावमध्ये पार पडली. सात दिवसीय कथेला लक्षणीय प्रतिसाद मिळाला. कथेनंतर शहराच्या विविध भागांसह अनेक गावांमध्ये श्री महादेव मंदिरात भाविकांची गर्दी वाढली होती.

खान्देशमधील शाळकरी मुलांसह अबालवृद्ध शिवमंदिरात दररोज दर्शनासाठी जात आहेत. हेच या कथेचे यश आहे. धुळे येथे नुकतीच १५ ते १९ या कालावधीत शिवमहापुराण कथा झाली. लाखो भाविकांनी कथेला हजेरी लावली. खान्देशात प्रदीप मिश्रांना मानणाऱ्या भाविकांची संख्या प्रचंड आहे.

हजारो खान्देशवासीय नोकरी, व्यवसायानिमित्त नाशिकमध्ये स्थिरावले आहेत. त्यामुळे नाशिकची शिवमहापुराण कथा मालेगाव व धुळेप्रमाणे यशस्वी होण्याची शक्यता आहे. कथास्थळी हजारो भाविक मुक्कामी राहतात.

pradip mishra
Nashik News: 2 लाख भाविक सप्तश्रृंगीच्या चरणी नतमस्तक; भाविकांनी साधली दिवाळीच्या सुट्ट्यांची पर्वणी

रात्री भजन, भावगीते गात आनंद साजरा करतात. जळगाव, शिरपुर, पारोळा, धुळे, नंदुरबार, चाळीसगाव, मालेगाव, मनमाड, नांदगाव, कळवण, बागलाण आदी भागातील श्रध्दाळूंची संख्या लक्षणीय असणार आहे.

दिवाळीच्या सुट्ट्या तसेच धुळे व नाशिक येथील शिवमहापुराण कथेच्या पाश्‍र्वभूमीवर नाशिक-मालेगावसह खान्देशमधील बसस्थानके हाऊसफुल आहेत. कथेसाठी जाणाऱ्या भाविकांमध्ये महिलांची संख्या सर्वाधिक आहे.

"पंडीत प्रदीप मिश्रा यांच्या कथेसाठी दोन ते तीन वर्षे वाट पहावी लागते. २०२५ अखेरपर्यंत देशातील विविध शहरांमध्ये कथा आरक्षित आहेत. प्रदीप मिश्रा यांची अन्य राज्यातील नियोजित कथा काही कारणांमुळे पुढे ढकलली गेली. त्यामुळे धुळे व नाशिक येथे प्रत्येकी पाच दिवसीय कथा मिळाली. नाशिकसह खान्देशवासिय यांनी कथेचा लाभ घेवून पंडीत प्रदीप मिश्रा यांचे विचार आचरणात आणावे."- दादा भुसे, पालकमंत्री

pradip mishra
Manoj Jarange Patil Sabha: शेणित फाटा येथे 101 एकरावर बुधवारी सभा! सभेची तयारी पूर्णत्वाकडे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.