Nashik News : जूनचा शेवटचा आठवडा सुरु झाला, मात्र अकाशात कधीतरी होणारी ढगांची गर्दी, कडक उन्हात स्वच्छ ढग अन् मधूनच अंधारून आल्यागत होणारे वातावरण, प्रचंड तपमानामुळे पाऊस येण्याचे बांधले जाणारे अंदाज अन् आला दिवस रोजच्या सारखाच कोरडा जाऊन प्रत्यक्षात पावसाची भेटणारी हुलकावणी... असे रोजचेच चित्र अंगवळणी पडलेल्या बळीराजाची आता पेरणी लांबणीवर पडू लागल्याने झोप उडत आहे. (Kharif sowing in district has been disrupted due to lack of rain nashik news)
पावसाअभावी जिल्ह्यातील खरीप पेरणी खोळंबली आहे. आजमितीसही तापमान चाळीशीपर्यंत असून, रोहिणीपाठोपाठ मृग नक्षत्रही कोरडेच गेले. गुरूवार (ता. २२) पासून आद्रा नक्षत्र सुरु होऊनही पावसाची हजेरी नसल्याने तोंडचे पाणी पळाले आहे. मेअखेरीस कोसळणारा वळवाचा वादळी पाऊस तर यंदा दुर्लभच झाला.
पण, हक्काचे मृग नक्षत्र सुरू झाल्यावर दरवर्षीप्रमाणे पाऊस येऊन वेळेत पेरणी होईल ही अपेक्षाही फोल ठरली. वास्तविक जूनच्या पहिल्या-दुसऱ्या आठवड्यात जिल्ह्यात कपाशी लागवड व मुग, मकाची पेरणी होऊन जाते. यंदा मात्र एखादा पाऊस सोडला, तर पावसाळा काय असतो हेही समजलेले नाही.
त्यातच आजपासून सुरू झालेल्या आद्रा नक्षत्राचा ईतिहास बेभरोशाचा असल्याने पेरणीयोग्य पाऊस पडणार का? याचे उत्तर सध्या तरी मिळेनासे झाले आहे. जिल्ह्यात काही शेतकऱ्यांनी पूर्वहंगामी कापसाची, तसेच भाजीपाला लागवड केली असली, तरी चांगला पाऊस नसल्याने खरीप पिकांची लागवड अद्याप तरी शक्य नाही.
हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?
दमदार पाऊस पडल्यानंतरच खऱ्या अर्थाने पेरणीला सुरवात होईल. पाऊस लांबल्यामुळे शेतकऱ्यांसह सामान्य नागरिकही हवालदिल झाले आहेत. मृग नक्षत्र अन् आद्राची सुरवात कोरडी गेल्यामुळे खरीप हंगाम यंदा अडचणीत आला असून, त्यामुळे बाजारपेठ ठप्प झाली आहे.
नगदी पिकांना फटका
पावसाने हुलकावणी दिल्यामुळे यंदा पेरणी लांबणीवर पडली आहे. जिल्ह्याच्या कोणत्याच भागात अद्याप एकही पेरणीयोग्य पाऊस झालेला नाही. त्यामुळे गेल्या वर्षीप्रमाणे यंदाही शेतकऱ्यांना उडीद, मूग या नगदी पिकांपासून वंचित राहण्याची वेळ आली आहे.
साधारणतः मृग नक्षत्रात पेरणीयोग्य पाऊस झाल्यास जिल्ह्यातील बहुतांश शेतकरी दोन महिन्यांत काढणीला येणारी उडीद, मूग ही पिके घेऊन नंतर कांद्याचे पिक घेतात. उडीद, मुगाच्या पेरणीची वेळ निघून गेल्यामुळे मका, कपाशी, सोयाबीनच्या क्षेत्रात वाढ होण्याची शक्यता आहे.
"पाऊस येईल असे सांगितले जात आहे. अद्याप पेरणीचा कालावधी उलटलेला नसल्याने शेतकऱ्यांनी चांगला पाऊस झाल्यावरच पेरणी करावी. घाई करू नये. अजूनही कपाशी, सोयाबीन, मका पिकाच्या पेरणीचा कालावधी बाकी आहे. कांदा लागवडीवर परिणाम होण्याची शक्यता कमी आहे. शेतकऱ्यांनी अजून तरी घाबरू नये." - रेजा बोडके, कृषि अधिकारी, पं. स. येवला
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.