Kharif Crop: दिंडोरी तालुक्यात 18 हजार हेक्टरवर खरिपाचे उद्दिष्ट; खरीप पेरणीपूर्व मशागतींच्या कामास सुरवात

Farmers plowing with Vani tractor before Kharif sowing.
Farmers plowing with Vani tractor before Kharif sowing.esakal
Updated on

Kharif Crop : खरिपाचा हंगाम काही दिवसांवर येऊन ठेपल्याने शेतकरी सज्ज झाला आहे. दिंडोरी तालुक्यात सध्या खरीप पेरणीपूर्व मशागतीच्या कामास सुरवात झाली आहे. नांगरणी, वखरणी, खत पसरविणे आदी कामांबरोबरच बी-बियाणे, खते खरेदीसाठी आर्थिक जुळवाजुळव शेतकऱ्यांकडून सुरू आहे.

दरम्यान, कृषी विभागाकडून देखील हंगामाची तयारी सुरु करण्यात आली असून, दिंडोरी तालुक्यात यंदा कृषी विभागातर्फे १८ हजार हेक्टर क्षेत्रावर खरिपाचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.

खरीप हंगामात शेतकऱ्यांना रासायनिक खताची टंचाई भासू नये यासाठी १६ हजार ०७३ मेट्रिक टन खताची मागणी करण्यात आली आहे. (Kharif target on 18 thousand hectares in Dindori taluka Start of tillage work before Kharif sowing nashik news)

मागील तीन वर्षांपासून शेतकरी राजा अस्मानी संकटाबरोबरच, कोविड, शेती मालाला नसलेला भाव, खते, बी-बियांनाच्या वाढत्या किमती, मजुर टंचाई बरोबरच वाढलेले मजुरीचे दर अशा विविध संकटांचा सामना करीत हवालदिल झाला आहे.

बळीराजा पुन्हा स्वत:ला सावरून काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या खरीप हंगामाच्या तयारीस लागला आहे. यात उन्हाचा वाढता पारा यामुळे तसेच, दाट विवाह तिथी यांचे नियोजन करीत शेतीची मशागतीसाठी वेळ काढून व मजुरांची मर्जी राखत कामे करावी लागत आहे.

खरीप हंगामात पिकाच्या निकोप आणि उत्तमवाढीसाठी जमिनीची मशागत करण्यावर शेतकऱ्यांनी भर दिला आहे. तालुक्यात मोहाडी, खडकसुकेणे, जानोरी, वणी, खेडगाव, मावडी, अहिवंतवाडी, पिंप्री अंचला, करंजखेड, खोरीपाडा, पांडाणे आदी ठिकाणी टोमॅटोसह इतर भाजीपाला व वेलवर्गीय पिकांबरोबरच सोयाबीन व मका पिकांचे क्षेत्र वाढले असा अंदाज वर्तविला जात आहे.

मक्याचे क्षेत्रात वाढ होताना दिसत आहे. बाजरी पीकही काही प्रमाणात घेतले जाण्याचा अंदाज आहे. तालुक्यातील शेतकऱ्यांचा सोयाबीनकडे मोठा कल असल्याने सोयाबीनसाठी सर्वसाधारण ५ हजार २३८ हेक्टर क्षेत्र पेरणीसाठी उपलब्ध आहेत.

त्यात पेरणीसाठी कृषी विभागाने २८८ मे.टन बियाणांची मागणी केली आहे. सोयाबीन बियाणे तुटवडा लक्षात घेता शेतकरी वर्गाने घरचे बियाणे वापरात आणून बीज प्रकिया करावी, असे आवाहन कृषी विभागाने केली असून त्यासाठी गावोगावी जाऊन बीज प्रक्रिया प्रात्यक्षिक दाखवून करण्यात येत आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

यंदा खरीप हंगामात १६ हजार ७३ मेट्रिक टन खत अपेक्षित आहे. यंदा शेतकऱ्यांनी कीड- रोगाच्या प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून शेताची खोल नांगरट व बांध स्वच्छ करावेत. अधिकृत विक्रेत्यांकडूनच खते बियाणे खरेदी करून पक्की पावती घ्यावी.

घरच्या तसेच दुकानातील सोयाबीन बियाण्याची उगवणक्षमता तपासणी करावी. असे आवाहन तालुका कृषी अधिकारी विजय पाटील यांनी केले आहे.

खरिपासाठी सर्वसाधारण क्षेत्र (हेक्टर मध्ये)

भात - ५७४३

सोयाबीन - ५२३८

नागली - ६०९

भुईमूग - २५७२

मका - ३००

आवश्यक बियाणे (मे..टन)

भात - १७२.००

सोयाबीन - २८८.००

नागली - २.४३

भुईमूग - २५७.००

मका - ६.००

खतांची मागणी (मे.टन)

युरिया - ६५००

डीएपी - १२७९

एमओपी - १४४

कॉम्पलेक्स - ६५००

एसएसपी - १६५

Farmers plowing with Vani tractor before Kharif sowing.
Dada Bhuse : कांदा टोमॅटो उत्पादकांसाठी दिलासादायक निर्णय : दादा भुसे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.