Khelo India : ‘खेलो इंडिया’ स्पर्धेत महाराष्ट्र अव्वल; नाशिकच्या खेळाडूंची चमकदार कामगिरी

khelo india
khelo indiaesakal
Updated on

नाशिक : देशातील युवकांना प्रोत्साहन देण्यासाठी केंद्र सरकारने सुरू केलेल्या ‘खेलो इंडिया यूथ गेम्स- २०२३’ या स्पर्धेत महाराष्ट्रातील खेळाडूंनी अव्वल क्रमांक पटकावत गतविजेता हरियानाला मागे टाकले. (khelo india Players from maharashtra beat defending champions Haryana to claim top spot nashik news)

महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांतील खेळाडूंनी तब्बल १६१ पदके मिळवत राज्याचे नाव पहिल्या क्रमांकावर पोचवले. यात नाशिकच्याही काही खेळाडूंनी दमदार कामगिरी करत खारीचा वाटा उचलला.

मध्य प्रदेश व नवी दिल्ली येथील आठ शहरांमधील ११ ठिकाणी या स्पर्धा झाल्या. यात देशातील ३६ राज्यांमधील पाच हजारांवर अॅथलेटिक्सने सहभाग नोंदवला. महाराष्ट्रातील खेळाडूंनी २०१८ च्या स्पर्धेतील विजेत्या हरियानालाही मागे टाकले.

दोन राज्यांमधील पदकतालिकेत तब्बल ३३ पदकांचा फरक आहे. महाराष्ट्रातील खेळाडूंनी ५६ सुवर्णपदके, ५५ रौप्य आणि ५० कांस्यपदके पटकावत महाराष्ट्राची शान वाढवली. यात नाशिकच्या खेळाडूंनी सहभागी होत टेबलटेनिस, वेटलिफ्टिंग, अॅथलेटिक्स, कॅनाईंग, रोइंग, तलवारबाजी या खेळात सहभाग घेतला.

नाशिकच्या खेळाडूंना एकूण किती पदके मिळाली, याविषयी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाकडे माहिती प्राप्त झालेली नाही. मात्र, नाशिकच्या खेळाडूंना पदक निश्चित झाल्याचे समजते.

हेही वाचा : ..ही काळजी घ्या नाहीतर खिसा होईल साफ!

khelo india
Jindal Fire Case : जिंदालमधील अग्निकांडप्रकरणी 7 जणांविरुद्ध गुन्हा दाखल

‘खेलो इंडिया’ स्पर्धा सुरू करण्याचा उद्देश

खेलो इंडिया स्पर्धेत आतापर्यंत महाराष्ट्र आणि हरियाना यांनीच वर्चस्व राखले आहे. तिसऱ्या क्रमांकावर दिल्लीचे स्थान आहे. मात्र, इतर राज्ये त्या तुलनेत खूपच मागे आहेत. मागे राहण्याची कारणे काय, याचा विचार झाला पाहिजे.

त्यांची या क्रीडाप्रकारातील कामगिरी काय, या सगळ्यांचा अभ्यास व्हायला हवा. त्यातून भारतात कोणत्या क्रीडाप्रकारांना मान्यता आहे, आंतरराष्ट्रीय स्तरावर छाप पाडण्यासाठी कोणत्या क्रीडाप्रकारांना आपण पाठिंबा देऊ शकतो, हे ठरवणे शक्य होईल.

ईशान्येकडील राज्ये किती प्रमाणात स्पर्धेत सहभागी होत आहेत, त्यांचा सहभाग वाढतो आहे का, यानंतर ही स्पर्धा ज्या राज्यात दिली जाईल, ते यजमान राज्य किती प्रमाणात आपले खेळाडू या स्पर्धेत उतरवते, या सगळ्या बाबींची नोंद ठेवली गेली पाहिजे. त्यातून या स्पर्धेचा मुख्य उद्देश साध्य होईल, असे प्रामुख्याने दिसून येते.

पदकतालिका

राज्य....सुवर्ण...रौप्य...कांस्य...एकूण

महाराष्ट्र...५६...५५...५०...१६१

हरियाना ...४१...३२...५५...१२८

राजस्थान...१९...१०...१९...४८

दिल्ली...१६...२२...२६...६४

khelo india
Nashik News: नाशिक-पुणे रेल्वेमार्गाचा प्रवास ‘खडतर’! MAHARAILकडून तूर्तास मूल्यांकन न करण्याच्या सूचना

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()