चांदोरी : ओझर-चांदोरी जिल्हा मार्गावर खेरवाडी नारायणगाव येथे मध्य रेल्वे मार्गावर उड्डाणपुलाचे काम पूर्णत्वास आले असून, लवकरच प्रवाशांच्या सोयीसाठी तो खुला होणार आहे.
रस्ते व रेल्वे वाहतुकीची अडचण दूर करण्यासाठी रेल्वे फाटकमुक्त करण्यासाठी उड्डाणपूल बांधण्यात आला.
उड्डाणपुलाचे बांधकाम खर्च ३९.१४ कोटी रुपये असून, मार्च २२ मध्ये सुरू झाले. आता तब्बल ९९ टक्के काम पूर्ण झाले आहे. ‘महारेल’ने २१ महिन्यांत उड्डाणपूल पूर्णत्वास नेला आहे. (Kherwadi railway flyover to be open for citizens Construction completed in 18 months by Maharail Nashik News)
ध्य रेल्वेने फेब्रुवारीत तीन दिवस रोज दोन तास मेगाब्लॉक घेत उड्डाणपुलावरील रेल्वे मार्गाच्या हद्दीतील मुख्य गर्डर टाकण्याचे काम पूर्ण केले. उड्डाणपुलाची उभारणीमधील हा मुख्य टप्पा होता.
ओझर-खेरवाडी-चांदोरी- सायखेडा या प्रमुख जिल्हा मार्गावर खेरवाडी नारायणगावयेथे मध्य रेल्वेमार्गावर रेल्वे फाटक असल्याने तासन्तास वाहतुकीचा खोळंबा होत होता. त्यामुळे रेल्वेने याठिकाणी उड्डाणपूल मंजूर केला.
गोदाकाठच्या शेतकऱ्यांना होणार फायदा
ओझर-चांदोरी-सायखेडा रस्ता पुढे सिन्नर-शिर्डीला जोडला जातो. या रस्त्यावर नित्याची रहदारी असते. गोदा काठसह सिन्नर परिसरातील शेतकऱ्यांना ओझर, पिंपळगाव बाजारपेठेत शेतमाल नेण्यासाठी हाच एकमेव जवळचा मार्ग आहे.
गुजरातहून पेठ, सुरगाण्याचे हजारो भाविक शिर्डीला जाण्यासाठी याच रस्त्याचा वापर करतात. रेल्वे फाटक उघडण्यासाठी लागणाऱ्या वेळेची बचत होणार आहे.
उड्डाणपुलाचे प्रमुख वैशिष्ट्ये
-५१ मीटर स्पॅन असलेल्या ५ क्रमांकाच्या स्टील गर्डरचे लॉन्चिंग केवळ २ दिवसांत
-रोज दोन तासांच्या रेल्वे ब्लॉकसह पूर्ण
-केबल्सला आतील बाजूने आच्छादित करणारा समर्पित केबल डक्ट
-कमानींसाठी उड्डाणपुलावर एलईडी पथदीप
-फोर कोट इपॉक्सी पेंटिंग सिस्टममुळे पुलाच्या सौंदर्यात वाढ
-ग्रामस्थांसाठी दोन्ही बाजूंनी काँक्रिटचे सेवा रस्ते
-वेग कमी न करता रेल्वेची मुक्त वाहतूक
-शेतकऱ्यांना बाजारपेठेत लवकर पोचण्यास मदत
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.