Nashik News : जिल्ह्यात लम्पीने 79 जनावारांचा मृत्यू

Lumpy Virus News
Lumpy Virus Newsesakal
Updated on

नाशिक : राज्यात २० हजार जनावारांचा लम्पी मृत्यू झालेला असताना नाशिक जिल्ह्यातही आतापर्यंत ७९ लम्पी बाधीत जनावरे दगावली आहेत. आतापर्यंत १ हजार ६०९ जनावरांना बाधा झाली आहे. यातील १ हजार २३२ जनावरे पूर्णपणे बरे झाले आहेत. जिल्ह्यात ९९.९९ टक्के जनावरांचे लसीकरण पूर्ण झाले आहेत.

जिल्ह्यातील १३ तालुक्यातील ९७ गावांमधील १ हजार ६०९ जनावरांना लम्पीची प्रादुर्भाव झाला आहे. यापैकी १ हजार २३२ बाधीत जनवारे बरी झालेली आहेत.

सद्यपरिस्थितीत २९८ जनावरे आजारी असून यातील अजूनही २५ जनावरे गंभीर श्रेणीत, ७० जनावरे मध्यम गंभीर तर २०३ जनावरे सौम्य श्रेणीत आहेत, त्याबाबत काळजी करण्याचे कारण आहे, अशी माहिती जिल्हा पशुसवंर्धन अधिकारी डॉ. विष्णू गर्जे यांनी दिली. (Killed 79 animals in district by Lumpy Disease Nashik News)

हेही वाचा : मुदत ठेवीच्या मुद्दलातून टीडीएस कपात? इथे करा तक्रार....

Lumpy Virus News
Nashik Agriculture Update : राज्यातील सर्व शेतकऱ्यांना 15 दिवसात मदतीचे वाटप

जिल्ह्यात एकूण ७९ पैकी ६२ जनावरांच्या मालकांना शासकीय मदत प्राप्त झाली आहे. यामध्ये २९ गायी, २१ बैल, १२ वासरू यांचा समावेश आहे. गायसाठी ३० हजार, बैलासाठी २५ हजार तर, वासरू करिता १६ हजार रूपयांचे शासकीय अनुदान मिळते.

हे अनुदान थेट पशुपालकांच्या खात्यावर वर्ग केले जाते. गायींसाठी ८ लाख ७० हजार, बैलांसाठी ५ लाख २५ हजार तर वासरांसाठी १ लाख ९२ हजार इतकी मदत पोहचली असल्याची माहीती डॉ विष्णू गर्जे यांनी दिली आहे. पशुसंवर्धन विभाग तसेच जिल्हा परिषदच्या पशुसवंर्धन विभागाने लसीकरणावर भर दिला गेला आहे. आतापर्यंत जिल्ह्यात ९९.९९ टक्के लसीकरण झाले आहे. जिल्ह्यात एकूण ८ लाख ९५ हजार ५० इतकी पशुगणना आहे, यापैकी ८ लाख ९४ हजार ९६० इतके लसिकरण झाले आहे. ११ हजार ५९० जनवारांचे लसीकरण अद्याप झालेले नाही.

Lumpy Virus News
Nashik Crime News : गुरुकुल आश्रमातील आणखी 5 मुलींवर अत्याचार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.