Nashik News : कोब्राने केला तरुणाच्या ओठांनाच दंश...!

king cobra bite young man lip nashik news
king cobra bite young man lip nashik newsesakal
Updated on

Nashik News : रात्री गाढ झोपेत असलेल्या युवकाच्या ओठालाच सर्वात विषारी समजल्या जाणाऱ्या किंग कोब्राने दंश केला. कोब्राचा दंश असल्याने २० वर्षीय युवकाला काही क्षणात अस्वस्थता जाणवू लागली. (king cobra bite young man lip nashik news)

प्रकृती खालावत गेल्याने त्यास तत्काळ नाशिक जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले असता, येथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी केलेल्या तातडीच्या उपचारांमुळे त्याला जीवदानच मिळाले आहे.

जव्हार (जि. पालघर) पासून काही अंतरावर असलेल्या आदिवासी पाड्यावर राहुल मोतीराम झेंडे (२०) कुटुंबीयांसह राहतो. शनिवारी (ता. ६) रात्री नेहमीप्रमाणे तो झोपलेला होता. मध्यरात्री तो गाढ झोपेत असताना त्याच्या खालच्या ओठाला सर्वात विषारी समजल्या जाणाऱ्या किंग कोब्राने दंश केला.

राहुलला काहीतरी चावल्यासारखे झाल्याने तो दचकून उठला तर, कोब्राला पाहून तो ओरडलाच. कुटुंबीयांनी त्याच्याकडे धाव घेईपर्यंत कोब्रा अंधारामुळे दिसेनासा झाला. तर, राहुल यास काही क्षणातच अस्वस्थता वाटू लागल्याने कुटुंबीयांनी त्यास जव्हार येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

king cobra bite young man lip nashik news
Unique Wedding : चट मंगनी पट शादी! ओझरच्या जंजाळे- अभंग परिवाराचा निर्णय

त्याच्यावर तातडीने उपचारही सुरू झाले. परंतु त्याची प्रकृती खालावत चालली होती. त्यामुळे रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यास तातडीने नाशिक जिल्हा रुग्णालयात हलविण्याचा निर्णय घेतला आणि रुग्णवाहिकेतून रविवारी (ता. ७) त्यास नाशिक जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.

जिल्हा रुग्णालयात आणले त्या वेळी राहुलची प्रकृती अत्यंत खालावलेली होती. त्याची शुद्ध हरपलेली होती. विषामुळे ओठाला मोठ्या प्रमाणात इन्फेक्शन झालेले होते. त्यामुळे त्याचे प्राण वाचविण्याचे मोठे आव्हान वैद्यकीय अधिकाऱ्यांसमोर होते. राहुल यास अतिदक्षता विभागात दाखल करण्यात येऊन तत्काळ व्हेंटिलेटर लावले.

तसेच तातडीने स्नेक बाईट प्रतिबंधक इंजेक्शन्स देण्यात आले. तीन दिवसांच्या उपचारानंतर राहुल काहीसा सावध झाला. मात्र व्हेंटिलेटर कायम होते. चार दिवसांच्या उपचारांनंतर त्याच्या जिवाचा धोका टळला. मात्र अजूनही त्याच्या ओठांना इन्फेक्शन आणि सूज आहे.

king cobra bite young man lip nashik news
BJP Kerala Story Sponsor : ‘दि केरला स्टोरी’ साठी भाजपवर स्पॉन्सर शोधण्याची वेळ! निवडणुकांचा परिणाम

जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अशोक थोरात, प्रभारी शल्यचिकित्सक डॉ. अरुण पवार, प्रभारी अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. नीलेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. संदीप सूर्यवंशी, डॉ. सुनील राठोड, डॉ. प्रतीक भांगरे यांच्यासह अतिदक्षता विभागातील कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतल्यानेच राहुल याचे प्राण वाचले.

..शक्यता कमीच होती

राहुल याच्या ओठांना कोब्राने दंश केल्याने त्याचा जीव वाचण्याची शक्यताच कमी होती. अत्यंत खालावलेल्या व बेशुद्ध अवस्थेमध्ये त्यास नाशिक जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. अतिदक्षता विभागात त्यास तातडीने व्हेंटिलेटर लावण्यात आले. तसेच, डॉ. प्रतीक भांगरे यांच्या मार्गदर्शनाखाली औषधोपचार सुरू झाला.

शरीरात पसरलेले कोब्राचे विषावर मात करण्यासाठी राहुल यास तब्बल ४२ ॲण्टी स्नेक इंजेक्शन्स देण्यात आले. उपचाराच्या तिसऱ्या दिवशी राहुल काहीसा सावध झाला. त्यास चार दिवस व्हेंटिलेटरद्वारे ऑक्सिजन देण्यात आले.

"रात्री झोपलेले असताना चावल्यासारखे झाले. उठून पाहिल्यानंतर तो साप पाहिल्यावर घाबरलो. पण काही वेळानंतर मला गरगरायला झाले. येथील डॉक्टरांमुळे मी वाचलो." - राहुल झेंडे, रुग्ण.

king cobra bite young man lip nashik news
Summer Business: कुल्फी, शीतपेय विक्रेत्यांचा व्यवसाय जोमात! तापमान वाढल्याने असंख्य व्यावसायिकांना दिलासा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.