'कंपन्यांचं जाळं तयार करून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे जनतेला फसवू शकणार नाहीत'
श्रीजी होम्स कंपनी अद्यापही नोंदणीकृत झालेली नाही. या कंपनीचे तीन पार्टनर असून त्यापैकी एक हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे मेहुणे श्रीधर पाटणकर आहेत. १० टक्के भागीदारीसह ते कंपनीचे मालक आहेत. उर्वरित दोन पार्टनर्रसची भागिदारी ९० टक्के आहे. कंपन्यांचं जाळं तयार करून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे जनतेला फसवू शकत नाहीत. या सर्व कंपन्यांचा उद्धव ठाकरेंनी हिशोब द्यावा, अशी मागणी भाजपाचे किरीट सोमय्या यांनी दिली आहे. आज ते नाशिकमध्ये बोलत होते. (latest politics news)
ठाकरे सरकारनंतर भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या निशाण्यावर आता ठाकरे कुटुंबीय आहेत. ठाकरेंच्या आणखी एका कंपनीची माहिती देणार असल्याचा इशारा सोमय्यांनी दिला होता. दरम्यान, नाशिक येथे पत्रकार परिशषदेत त्यांनी आणखी एका कंपनी संदर्भात उद्धव ठाकरेंची पोलखोल केली आहे. ते म्हणाले, श्रीजी होम्स कंपनीमध्ये श्रीधर पाटणकर आणि माधव पाटणकर यांचे शंभर शेअर्स आहेत. याशिवाय मुख्यमंत्री ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांचे 9800 शेअर्स आहेत, असे असूनही अजुनही कंपनी नोंदणीकृत का झालेली नाही याचे उत्तर मुख्यमंत्र्यांनी द्यावे, असंही ते म्हणाले आहेत.
यावेळी कंपनीच्या व्यवहाराचा खुलासा करताना सोमय्या म्हणाले, श्रीजी होम्स कंपनीमध्ये श्रीधर पाटणकर साडेदहा टक्के, माधव पाटणकर अर्धा टक्का आणि ८९ टक्के रश्मी ठाकरे, उद्धव ठाकरे पार्टनर आहेत. त्यामुळे २९ कोटी ६५ लाख २९ हजार ३२० रुपयांच्या अनेक कंपन्यांचे स्तर तयार करून मुख्यमंत्री ठाकरे जनतेला मूर्ख बनवत आहेत. तसचं या कंपन्यांची नोंदणी केलेली नसल्याने कंपनीची कागदपत्रे केंद्रीय संस्थानाही पाठवली आहेत, असा इशाराही त्यांनी दिला आहे. त्यामुळे या कपंनीच्या आर्थिक व्यवहाराची चौकशी झाली पाहिजे, अशी मागणीही यावेळी सोमय्यांनी केली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.