Makar Sankranti 2023 : शहरात पतंगप्रेमींचा उत्साह शिगेला; सलग सुटी आल्याने आनंद द्विगुणित!

Kite Market
Kite Marketesakal
Updated on

जुने नाशिक : मकर संक्रांत अवघ्या दोन दिवसांवर येऊन ठेपली आहे. शनिवार आणि रविवार लागून सुटी आल्याने पतंगप्रेमींचा उत्साह शिगेला पोचला आहे. शुक्रवार (ता. १३) पतंग बाजारपेठ गर्दीने फुलून निघाली होती.

प्रत्येक दुकानावर पतंग आणि मांजा खरेदीसाठी नागरिकांची गर्दी दिसून आली. (Kite lovers excited in city happiness doubled due to consecutive holidays Makar Sankranti 2023 nashik news)

नागरिकांमध्ये पतंग उडविण्याचा आनंद काही वेगळाच असतो. लहानांपासून तर थोरल्यापर्यंत सर्वजण पतंग उडवण्याचा आनंद घेतात. तरुणांचा मात्र यात अधिक पुढाकार असतो. त्यात यंदा प्रतिबंधमुक्त संक्रांत साजरी होणार असल्याने पतंगप्रेमींच्या आनंदात आणखीनच भर पडली आहे.

इतकेच नाही तर संक्रांतीस शनिवार, रविवार लागून सुटी आल्याने नागरिकांचा आनंद द्विगुणित झाला आहे. शुक्रवारी (ता. १३) दिवसभर पतंगाचे बाजारपेठ गर्दीने गजबजून गेली होती. सायंकाळी दुकानांमध्ये खरेदीसाठी अधिक गर्दी झाल्याचे बघावयास मिळाले.

पतंग आणि मांजास मागणी वाढल्याने दुकानदारांनी समाधान व्यक्त केले. गेल्या वर्षीच्या तुलनेत तीस ते चाळीस टक्के पतंगाची मागणी वाढली आहे. रंगबिरंगी विविध प्रकार, कागदाच्या पतंग बाजारात विक्री होत होती.

सर्वच प्रकारच्या पतंग बाजारात दाखल झाल्याने पतंगप्रेमींनीही समाधान व्यक्त केले. ६ इंच ते ४ फूट पतंग विक्रीस आहे. २ ते १५ रुपयांपर्यंत पतंग विक्री होत आहे. तर, विविध पक्षांच्या आकाराचे कापडी पतंगदेखील बाजारात विक्रीस आल्याचे बघावयास मिळाले.

त्यांचे दर १०० १५० रुपयांपर्यंत असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले. तरुणांकडून रामपुरी पतंगाला अधिक मागणी होती. तर चिमुकल्याचा विविध प्रकारचे कार्टून आणि चित्रपटांचे चित्र असलेले प्लॅस्टिक पतंग खरेदीकडे कल दिसला.

हेही वाचा : सूर्यकुमार...भारतीय क्रिकेट मधला 'लंबी रेस का...'

Kite Market
Nashik News : थकबाकीदारांसमोर विविध विभागाने टेकले गुडघे; आता जप्ती वॉरंट बजावण्याचा नवा आदेश

पतंग प्रकार

रामपुरी, हॅप्पी न्यू इयर २०२३, आय लव माय इंडिया, तिरंगा, फ्री फायर, प्लॅनेट रायडर, मटका, मार्बल, कापडी, प्रिंटेड मटका, येवला धोबी प्रिंटेड, पारंपारिक कागदी, स्पायडर मॅन, कार्टून, बेटी बचाव बेटी पढाव सामाजिक संदेश देणारी, इंग्लंडचा ध्वज असलेली पतंग

कॉटन मांजा प्रकार

मांजा (पांडा) दर (रील)

चार तारी १००

सहा तारी १५०

नऊ तारी १५०

बारा तारी २००

सोळा तारी २५०

"गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा पतंगाला चांगली मागणी आहे. ४० टक्के दरवाढ झाली आहे. पतंगप्रेमींमध्येही उत्साह अधिक दिसून येत आहे." - आसिफ खान, विक्रेता

Kite Market
Nashik News: यंदा व्‍यावसायिक अभ्यासक्रमांचे वेळेतच प्रवेश; CET परीक्षांचे संभाव्‍य वेळापत्रक जाहीर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.