Kojagiri Paurnima 2022 : शरदाच्या चांदण्यात दुग्धप्राशनाचा आनंद

Kojagiri Paurnima News
Kojagiri Paurnima Newsesakal
Updated on

नाशिक : निरभ्र आकाशातील शरदाच्या चांदण्यात व चंद्राच्या शीतल व मंद प्रकाशात नाशिककरांनी कोजागिरीनिमित्त दुग्धप्राशनाचा आनंद घेतला. कोजागिरीनिमित्त शहरासह उपनगरांत विविध धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रम झाले. दरम्यान, सायंकाळनंतर दुधाच्या मागणीत मोठी वाढ होऊन ग्राहकांना लिटरभर दुधासाठी शंभर रुपये मोजावे लागले. (Kojagiri Purnima 2022 joy of Drinking Milk in autumn moon Nashik Latest Marathi News)

दोन वर्षांनंतर प्रथमच निर्बंधमुक्त वातावरणात साजऱ्या होणाऱ्या कोजागिरी पोर्णिमेसाठी यंदा जवळचे नातेवाईक, मित्रमंडळींच्या उपस्थितीत कोजागिरीच्या दुग्धप्राशनाचा आनंद लुटला. विविध मंडळे, मंदिरांमध्यही विविध सांस्कृतिक कार्यक्रम झाले. याशिवाय काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या महापालिका निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर अनेक इच्छुकांनीही आपल्या भागात कोजागिरीचे आयोजन करत आपली मतपेढी अधिक भक्कम करण्याचा प्रयत्न केला. विविध सोसायट्यांमध्ये, कॉलनीत कोजागिरीनिमित्त महिला व व मुलांसाठी विविध स्पर्धा झाल्या. यंदा दुधात टाकण्यासाठी लागणाऱ्या केशर, काजू, बदाम यांच्यासह मसाल्याच्या दरांत दहा ते १५ टक्के वाढ झाल्याचे विक्रेत्यांनी सांगितले.

कॉलेज रोडला स्वराभिषेक

नाशिक मध्यच्या आमदार प्रा. देवयानी फरांदे यांच्यातर्फे कोजागिरीचे औचित्य साधत बॉईज टाऊन हायस्कूलच्या मैदानावर शौनक अभिषेकी यांच्या ‘स्वराभिषेक’ या मराठी गाण्यांचा कार्यक्रम झाला. कार्यक्रमास नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. कार्यक्रमानंतर उपस्थितांचा दुग्धप्राशनाचा कार्यक्रमही रंगला.

Kojagiri Paurnima News
Kawad Yatra : परतीच्या पावसाच्या सरी झेलत कावडधारक सप्तश्रृंग गडाकडे मार्गस्थ

जनार्दनस्वामी आश्रमात संगीतमय प्रवचन

औरंगाबाद रोडवरील राष्ट्रसंत जनार्दनस्वामी आश्रमात दरवर्षीप्रमाणे यंदाही कोजागिरी पोर्णिमेनिमित्त स्वामी माधवगिरी महाराजांच्या संगीतमय प्रवचन झाले. जय बाबाजी परिवाराचे शिष्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. दोन तासांच्या प्रवचनानंतर उपस्थितांनी दुग्धप्राशनाचा आनंद लुटला.

दुधाच्या दराने गाठली शंभरी

जुन्या नाशिकमधील अब्दुल हमीद चौकात पारंपरिक दूधबाजार भरतो. याठिकाणी दूधाचे दर मागणी व पुरवठ्यानुसार रोज बदलतात. पुरवठा कमी राहिल्याने पितृपक्ष व त्यानंतर आलेल्या नवरात्रोत्सवातही दूधाचे दर तेजीतच राहिले. शनिवारी (ता. ८) ९० रुपये लिटर असलेल्या लिटरभर दुधासाठी रविवारी शंभर रुपये मोजावे लागलेते. सायंकाळनंतर याठिकाणीही दुधाचा तुटवडा जाणवू लागल्यावर अनेकांनी विविध ठिकाणच्या डेअरीतून आलेल्या दुधाच्या पिशव्यांना पसंती देत दुग्धप्राशनाचा आनंद लुटला.

Kojagiri Paurnima News
World Mental Health Day : कोरोनानंतर मानसिक आजारांत 25 टक्‍यांपर्यंत वाढ

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()